'हिम्मत सिंह'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या कधी प्रदर्शित होणार Special Ops 2.0

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 11:52 AM2024-04-04T11:52:24+5:302024-04-04T12:09:05+5:30

सीरीजचा तिसरा सीझन हा सर्वोत्तम ठरू शकतो.

Neeraj Pandey Gives An Exclusive Update About Special Ops 2.0 | 'हिम्मत सिंह'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या कधी प्रदर्शित होणार Special Ops 2.0

'हिम्मत सिंह'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या कधी प्रदर्शित होणार Special Ops 2.0

सध्या ओटीटी प्लॅटफोर्मवरील विविध विषयांवरील वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  Special Ops या वेब सीरिजच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली होती. या वेब सीरिजमधील अभिनेता के के मेनन (Kay Kay Menon) यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होतं.  के के मेनन यांनी हिम्मत सिंह या रॉ एजंटची भूमिका स्पेशल ओप्समध्ये साकारली होती. Special Ops  ही डिस्ने प्लस हॉटस्टारची सर्वात यशस्वी वेब सिरीज आहे. या स्पाय थ्रिलर सीरिजच्या पुढच्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच, दिग्दर्शक नीरज पांडे यांनी Special Ops नवीन सीझनबद्दल मोठं अपडेट दिलं आहे. 

Special Ops या स्पाय थ्रिलर वेब सीरिजच्या पुढच्या सीझनची अधिकृत घोषणा लवकरच केली जाऊ शकते. सीरिजचं शुटिंग पूर्ण झाल्यचं नीरज पांडे यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, "बुडापेस्टपासून तुर्की आणि जॉर्जियापर्यंत जगाच्या अनेक कोपऱ्यांमध्ये Special Ops सीरीज शूट केली आहे. सध्या हा शो पोस्ट प्रॉडक्शनमध्ये आहे. या शोचे व्हिज्युअल इफेक्ट (VFX) आधीच्या शोपेक्षा खूप चांगले आणि जबरदस्त असतील. बहुतांश वेळ VFX मध्ये जात आहे. त्यावरही काम सुरू आहे. दोन-तीन महिन्यांत व्हीएफएक्सचे काम पूर्ण होईल'. 

VFX कामाला दोन-तीन महिने लागत असल्यानेे 2024 च्या अखेरीस ही वेब सिरीज प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. 2020 मध्ये Special Ops प्रदर्शित झाल्यानंतर 'स्पेशल ऑप्स 1.5 - द हिम्मत स्टोरी' 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. Special Ops ही कथा रॉ एजंटच्या जीवनावर आधारित आहे, ज्यामध्ये त्याचा संघर्ष दिसून येतोय. आता पुढच्या नव्या कोऱ्या सीझनमधून दिग्दर्शक कोणती कथा प्रेक्षकांसमोर आणणार आहेत, हे या वेबसीरिजच्या रिलीजनंतर कळेल. नीरज पांडे निर्मित या सीरीजचा नवा सीझन प्रेक्षकांना नक्की जागी खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरेल.
 

Web Title: Neeraj Pandey Gives An Exclusive Update About Special Ops 2.0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.