महफिल फिरसे जमेगी! 'लाहोर नाही आता मुंबईत...' नेटफ्लिक्सने केली 'हीरामंडी 2' ची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 12:33 PM2024-06-03T12:33:01+5:302024-06-03T12:45:37+5:30

मुंबईतील कार्टर रोड येथे फ्लॅश मॉब आयोजित करण्यात आला होता. यावेळी हीरामंडी सीक्वेलची घोषणा करण्यात आली.

Netflix announces Heeramandi 2 by doing flash mob of 100 female dancers at carter road bandra | महफिल फिरसे जमेगी! 'लाहोर नाही आता मुंबईत...' नेटफ्लिक्सने केली 'हीरामंडी 2' ची घोषणा

महफिल फिरसे जमेगी! 'लाहोर नाही आता मुंबईत...' नेटफ्लिक्सने केली 'हीरामंडी 2' ची घोषणा

Heeramandi 2: संजय लीला भन्साळींच्या (Sanjay Leela Bhansali)  'हीरामंडी : द डायमंड बाजार' सीरिजने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. भन्साळी स्टाईलप्रमाणेच भव्य सेट, आकर्षक कॉस्च्युम, सुंदर गाणी, डायलॉग्समुळे ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. 'हीरामंडी'तील वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची स्वातंत्र्यपूर्व काळातील कथा दाखवण्यात आली आहे. नुकतंच सीरिजच्या सीक्वेलची घोषणा झाली आहे. 

मुंबईतील कार्टर रोड येथे फ्लॅश मॉब आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ट्रेडिशनल अनारकली गाऊनमध्ये १०० नृत्यांगनांनी परफॉर्मन्स दिला. पायात घुंगरु घालून त्या हीरामंडीच्या गाण्यावर थिरकल्या. बिब्बोजानचा लोकप्रिय झालेला गजगामिनी वॉकही केला. या माध्यमातून 'हीरामंडी 2' ची घोषणा करण्यात आली. 

नेटफ्लिक्सच्या VP Content मोनिका शेरगिल म्हणाल्या, "संजय लीला भन्साळी यांनी अशी काही जादू केली की हीरामंडी आपल्यासमोर उभी राहिली. प्रेक्षक सीरिजच्या प्रेमात पडले. मला हे सांगताना आनंद होतोय की हीरामंडी सीझन 2 मधून आपण पुन्हा भेटणार आहोत."

हीरामंडी 2 मध्ये आता सर्व महिला लाहोरमधून थेट सिनेविश्वास येतील. फाळणीनंतर या महिला लाहोर सोडतील आणि बहुतांश महिला मुंबईत सेटल होतील. त्या मुंबई फिल्म इंडस्ट्री किंवा कोलकता फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश करतील. डान्स आणि गाण्याचा त्यांचा प्रवास तोच राहील मात्र आधी त्या नवाबांसाठी परफॉर्म करायच्या आता निर्मात्यांसाठी करतील. अशा प्रकारे आम्ही दुसरा सीझन प्लॅन करत आहोत, बघू कसं होतंय. अशी माहिती संजय लीला भन्साळींनी माध्यमांना दिली.

Web Title: Netflix announces Heeramandi 2 by doing flash mob of 100 female dancers at carter road bandra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.