Netflix : नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअर करणं पडणार महागात; भारतात मात्र...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 03:19 PM2022-12-23T15:19:38+5:302022-12-23T15:21:01+5:30
एखाद्याकडे नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन असेल तर त्याच्या मित्र परिवाराची चंगळच असते.
एखाद्याकडे नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन असेल तर त्याच्या मित्र परिवाराची चंगळच असते. ज्याचे सबस्क्रिप्शन आहे त्याच्याकडून पासवर्ड घेऊन फुकट नेटफ्लिक्स बघायचे हे आपल्यापैकी बरेच जणं करत असणार. पण आता पासवर्ड शेअर कराल तर तो गुन्हा ठरणार आहे.
ब्रिटनमध्ये पासवर्ड शेअर करणं पडणार महागात
नेटफ्लिक्स पासवर्ड शेअर केल्याने कंपनीला मोठे नुकसान होते असा दावा नेटफ्लिक्सने केला आहे. मात्र यामुळे भारतीयांना चिंता करण्याची गरज नाही. कारण हा नियम केवळ एका देशात लागू करण्यात येणार आहे. युनाए़टेड किंग्डम मध्ये नेटफ्लिक्स पासवर्ड शेअर केला तर कारवाई होणार आहे. सर्व स्ट्रीमिंग सर्व्हिस पासवर्ड शेअर करणे लवकरच अवैध मानले जाणार आहे. असे करणाऱ्यांवर फ्रॉड आणि कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी केस केली जाईल. म्हणजे आता युके मध्ये राहणाऱ्या नागरिकांना पासवर्ड शेअर करणे माहागत पडणार आहे.
भारतात अद्याप नाही हा नियम
ब्रिटन सोडून इतर देशांना याची चिंता करण्याची गरज नाही. कारण इतर देशांमध्ये हा नियम अद्याप लागू केलेला नाही. मात्र नेटफ्लिक्सने याआधीच घोषणा केली होती की पुढील वर्षापासून पासवर्ड शेअर करण्याची सुविधा बदलण्यात येईल. तरी अद्याप यावर काही हालचाल नेटफ्लिक्सकडून करण्यात आलेली नाही.