पुन्हा एकदा दमदार भूमिकेत मकरंद देशपांडे; 'शूरवीर' म्हणत झळकणार अॅक्शन ड्रामा सीरिजमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 05:43 PM2022-07-06T17:43:13+5:302022-07-06T17:52:30+5:30

Makrand Deshpande: १५ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सीरिजमध्ये भारतातील टास्क फोर्सवर भाष्य करण्यात येणार आहे.

now how powerful actor makrand deshpande prepared for his role in shoorveer | पुन्हा एकदा दमदार भूमिकेत मकरंद देशपांडे; 'शूरवीर' म्हणत झळकणार अॅक्शन ड्रामा सीरिजमध्ये

पुन्हा एकदा दमदार भूमिकेत मकरंद देशपांडे; 'शूरवीर' म्हणत झळकणार अॅक्शन ड्रामा सीरिजमध्ये

googlenewsNext

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे मकरंद देशपांडे (makarande deshpande). अभ्यासू अभिनेता आणि कसदार अभिनयशैली यामुळे मकरंद सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. मराठीसह हिंदी मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये मकरंद झळकला असून पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. अनेक धाटणीच्या चित्रपटांमध्ये झळकलेले मकरंद यावेळी एका मिलट्री ड्रामा सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. या सीरिजचा नुकताच त्यांनी अनुभव शेअर केला आहे.
मकरंद देशपांडे लवकरच डिझ्नी + हॉटस्टारच्या 'शूरवीर' (shoorveer) या सीरिजमध्ये झळकणार आहेत.

१५ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सीरिजमध्ये भारतातील टास्क फोर्सवर भाष्य करण्यात येणार आहे. या टास्क फोर्समध्ये देशावर येणारं संकट परतवून लावणाऱ्या तीनही दलांचा समावेश असतो. या फोर्सच्या कामाचं वर्णन या सीरिजमध्ये करण्यात येणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यानिमित्ताने मकरंद देशपांडे यांनी त्यांच्या भूमिकेविषय़ी भाष्य केलं.

 “हे पात्र साकारण्यासाठी मला बराच अभ्यास करावा लागला. कारण एका मोठ्या अधिकाऱ्याची भूमिका साकारण्यासाठी त्यासारखा स्वभाव, शिस्त, कुशाग्र बुद्धिमत्ता, जबाबदार व्यक्तीमत्व सारं काही अंगी बाणण्यासाठी मला शारीरिक बदलासोबत मानसिक बदलही करावे लागले. अशी व्यक्तिरेखा साकारण्याची ही सर्वात मोठी कसोटी असते. कारण जेव्हा तुम्ही कमांडो असता तेव्हा तुम्ही स्वतःला त्यासाठी तयार करु शकता. पण, ज्यावेळी तुमच्यावर सर्व जबाबदारी असते. तुमच्या एका निर्णयावर सारं काही ठरणार असतं त्यावेळी जबाबदार व्यक्तीसारखं दिसण्याचीही गरज असते. हे एकप्रकारे स्वतःवर विश्वास ठेवण्यासारखे होते", असं मकरंद म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "मी म्हणेन की ही भूमिका साकारताना मी एक व्यक्ती म्हणून घडत गेलो. शूरवीरमधील माझ्या भूमिकेसाठी मला माझे दिग्दर्शक कनिष्क वर्मा, समर खान, लेखक मयंक आणि संपूर्ण क्रिएटिव्ह टीमची खूप मदत झाली."

दरम्यान, या सीरिजमध्ये मकरंद देशपांडेसह मनीष चौधरी, रेजिना कॅसांड्रा, अरमान रल्हान, आदिल खान, अभिषेक साहा, अंजली बारोट, कुलदीप सरीन, आरिफ झकेरिया, फैसल रशीद, साहिल मेहता आणि शिव्या पठाणी हे कलाकार स्क्रीन शेअर करणार आहेत.

Web Title: now how powerful actor makrand deshpande prepared for his role in shoorveer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.