"आप नोकरी कर रहे है और में ड्यूटी.."; 'पाताल लोक २'चा उत्कंठावर्धक ट्रेलर, हाथी राम चौधरीचं नवं मिशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 14:30 IST2025-01-06T14:28:27+5:302025-01-06T14:30:00+5:30
'पाताल लोक २'चा ट्रेलर रिलीज झालाय. प्रेक्षकांची ट्रेलरचा चांगलीच पसंती मिळालीय (paatal lok 2)

"आप नोकरी कर रहे है और में ड्यूटी.."; 'पाताल लोक २'चा उत्कंठावर्धक ट्रेलर, हाथी राम चौधरीचं नवं मिशन
गेल्या काही दिवसांपासून 'पाताल लोक २'ची चांगलीच चर्चा आहे. पोस्टर, टीझरनंतर या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झालाय. वेबसीरिजचा ट्रेलर येताच चाहत्यांनी या ट्रेलरवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. 'पाताल लोक २'मध्ये हाथी राम चौधरी (जयदीप अहलावत) नवीन मिशनमध्ये दिसणार आहे. हे मिशन सोडवायला हाथी रामला पुन्हा एकदा अडचणींचा सामना करावा लागणार आहे. काय आहे 'पाताल लोक २'च्या ट्रेलरमध्ये? जाणून घ्या. (paatal lok 2)
'पाताल लोक २'चा उत्कंठावर्धक ट्रेलर
'पाताल लोक २'च्या ट्रेलरमध्ये दिसतं की, नोकरी आणि कुटुंबाला सांभाळण्यात हाथी रामची तारेवरची कसरत दिसतेय. अशातच ज्युनियर ऑफिसर म्हणून त्याच्या हाताखाली काम केलेल्या त्याच्या साहाय्यकाची बढती होऊन तो वरिष्ठ पदावर पोहोचतो. त्यामुळे एक वेगळीच घुसमट हाथी रामच्या मनात असते. अशातच पोलीस खात्याला एका हत्येचा तपास करण्याची केस येते. ही केस सोडवायला हाथी रामला नागालँडला जावं लागतं. पुढे काय घडणार? हे वेबसीरिज रिलीज झाल्यावर कळेल.
कधी रिलीज होणार 'पाताल लोक २'?
'पाताल लोक २'चा नवीन सीझन १७ जानेवारी २०२५ ला प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. 'पाताल लोक २'मध्ये जयदीप अहलावत पुन्हा एकदा हाथी राम चौधरीच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय या वेबसीरिजमध्ये तिलोत्तमा शोमे, इश्वक सिंग, गुल पनाग, अनुराग अरोरा या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. 'पाताल लोक'चा दुसरा सीझन पाहायला सर्वजण आतुर आहेत. पुन्हा एकदा रहस्यमयी कथानकाने प्रेक्षकांचं चांगलंच लक्ष वेधलं आहे.