सोशल मीडियावर अचानक ट्रेंड होतेय ४ वर्ष जुनी वेबसीरिज, IMDB वर ८.१ रेटिंग; तुम्ही पाहिलीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 15:55 IST2025-01-17T15:53:18+5:302025-01-17T15:55:41+5:30

सोशल मीडियावर ४ वर्ष जुनी ही वेबसीरिज अचानक ट्रेंडिंग होतेय. या वेबसीरिजची सध्या चर्चा होतेय

paatal lok webseries is suddenly trending on social media cause paatal lok 2 | सोशल मीडियावर अचानक ट्रेंड होतेय ४ वर्ष जुनी वेबसीरिज, IMDB वर ८.१ रेटिंग; तुम्ही पाहिलीत?

सोशल मीडियावर अचानक ट्रेंड होतेय ४ वर्ष जुनी वेबसीरिज, IMDB वर ८.१ रेटिंग; तुम्ही पाहिलीत?

सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होईल काय सांगता येत नाही. अशातच सोशल मीडियावर एक वेबसीरिज ट्रेंड होतेय. ही वेबसीरिज २०२० साली रिलीज झाली होती. या वेबसीरिजचा दुसरा सीझन अचानक रिलीज झाल्याने या वेबसीरिजचा पहिला सीझन अचानक रिलीज होतोय. या वेबसीरिजचा पहिला सीझन लॉकडाउनच्या काळात आलेला आणि तो प्रचंड गाजलेला. कोणती आहे ही वेबसीरिज? ती अचानक का ट्रेंड होतेय? जाणून घ्या.

ही वेबसीरिज अचानक होतोय ट्रेंड

या वेबसीरिजचं नाव आहे 'पाताल लोक'. २०२० साली रिलीज झालेली 'पाताल लोक' ही वेबसीरिज अचानक पुन्हा ट्रेंड होतेय. याचं कारण म्हणजे 'पाताल लोक'चा नुकताच दुसरा सीझन नुकताच रिलीज झालाय. त्यामुळे 'पाताल लोक'चा पहिला सीझन पुन्हा एकदा ट्रेंड होतोय. when man loves dog he is a good men, and when dog loves men he is a good men हा वेबसीरिजमधील डायलॉग चांगलाच गाजला. आजही या वेबसीरिजमधील हाथोडा त्यागीला लोक विसरले नाहीत.

'पाताल लोक २'ची चर्चा

या वेबसीरिजमध्ये कलाकारांचा दमदार अभिनय चर्चेत राहिला. या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये जयदीप अहलावत, नीरज कबी, इश्वक सिंग, गुल पनाग या कलाकारांनी भूमिका साकारली होती. 'पाताल लोक'चा दुसरा सीझनही सध्या चांगलाच चर्चेत आहे. IMDB वर 'पाताल लोक'ला ८.१ रेटिंग आहे. 'किल्ला'सारखा मराठी सिनेमा दिग्दर्शित करणाऱ्या अविनाश अरुण यांनी 'पाताल लोक'चं दिग्दर्शन केलंय.

Web Title: paatal lok webseries is suddenly trending on social media cause paatal lok 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.