Panchayat 3 Web Series: प्रधानजींचं घर, पाण्याची टाकी, जाणून घ्या कुठे आहे 'पंचायत'मधलं खरं गाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 09:20 AM2024-06-01T09:20:29+5:302024-06-01T09:21:07+5:30

Panchayat 3 Web Series: सध्या सर्वत्र पंचायत ३ वेबसीरिजची चर्चा आहे. ही बहुचर्चित वेबसीरिज नुकतीच अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज झाली आहे. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि रघुबीर यादव या स्टार्सनी 'पंचायत ३'मध्ये पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने चाहत्यांना प्रभावित केले आहे.

Panchayat 3 Web Series: Pradhanji's house, water tank, know where is the real village in 'Panchayat'? | Panchayat 3 Web Series: प्रधानजींचं घर, पाण्याची टाकी, जाणून घ्या कुठे आहे 'पंचायत'मधलं खरं गाव?

Panchayat 3 Web Series: प्रधानजींचं घर, पाण्याची टाकी, जाणून घ्या कुठे आहे 'पंचायत'मधलं खरं गाव?

सध्या सर्वत्र 'पंचायत ३' (Panchayat 3 Web Series) वेबसीरिजची चर्चा आहे. ही बहुचर्चित वेबसीरिज नुकतीच अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज झाली आहे. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि रघुबीर यादव या स्टार्सनी 'पंचायत ३'मध्ये पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने चाहत्यांना प्रभावित केले आहे. या वेबसीरिजची प्रेक्षकांमध्ये भरपूर क्रेझ पाहायला मिळत आहे. पंचायत ३मधील फक्त स्टारकास्टचं नावच नाही तर सीरिजमध्ये दाखवलेल्या गावाचं नावदेखील लोकांमध्ये लोकप्रिय झाले आहे. मात्र हे फुलेरा गाव नसून मध्य प्रदेशातील सिहोर जिल्हा आहे.

दीपक कुमार मिश्रा दिग्दर्शित 'पंचायत ३' वेबसीरिजमध्ये गावातील लोकांचे राहणीमानापासून एकमेकांच्या आयुष्यातील सहभागांपर्यंतच्या छोट्या छोट्या गोष्टींचं उत्तमरित्या दाखवण्यात आली आहे. पंचायत ३ची संपूर्ण कथा उत्तर प्रदेशमधील फुलेरा गावाच्या अवतीभवती फिरते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही पंचायत खरी आहे, पण हे गाव 'फुलेरा' नसून सिहोर आहे. हा कुठला जिल्हा आणि कोणते गाव आहे, चला जाणून घेऊया.

पंचायत ३चं या गावात झालंय शूटिंग
पंचायत ३ सीरिजमध्ये दाखवलेली पात्रे आणि त्यांचे संवाद लोकांच्या ओठांवर तर आहेतच पण या गावाचे नाव 'फुलेरा' देखील लोकांच्या चांगलेच लक्षात राहिले आहे. मात्र, वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आलेले गाव 'फुलेरा' नसून 'महोडिया' आहे, जे मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील आहे. या गावाचे प्रमुख म्हणून दाखवलेले घर माजी सरपंच प्रतिनिधी लाल सिंह सिसोदिया यांचे आहे, जे 'पंचायत' वेब सीरिजमध्ये गावप्रमुख मंजू देवी, त्यांचे पती बृजभूषण कुमार आणि रिंकी यांचे घर म्हणून दाखवले आहे.
याशिवाय सचिवजी अभिषेक त्रिपाठी ज्या पंचायत कार्यालयात काम करतो आणि राहतो ते महोडिया गावातील खरे पंचायत कार्यालय आहे. पंचायतच्या तिन्ही सीझनचं शूटिंग महोडिया गावात करण्यात आले आहे.

भोपाळपासून किती किलोमीटर दूर सिहोर जिल्हा
'पंचायत ३' पाहिल्यानंतर एकदा या गावाला भेट द्यावी, असे वाटत असेल, तर न डगमगता भेट देऊ शकता. मध्य प्रदेशातील 'सिहोर' जिल्ह्याच्या अधिकृत सरकारी वेबसाइटनुसार, भोपाळ ते सिहोर हे अंतर अंदाजे ३५ किलोमीटर आहे. याशिवाय 'सिहोर' रेल्वे स्टेशन देखील उज्जैन आणि भोपाळ दरम्यान आहे. पूर्वी भोपाळ हा सिहोर जिल्ह्याचा भाग होता, पण १९७२ मध्ये सिहोर आणि भोपाळ वेगळे झाले. सिहोरचे जुने नाव 'सिद्धपूर' आहे.

Web Title: Panchayat 3 Web Series: Pradhanji's house, water tank, know where is the real village in 'Panchayat'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.