'पंचायत 3'चं शूटींग करताना नीना गुप्ता होत्या नाराज, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 04:36 PM2024-05-29T16:36:26+5:302024-05-29T16:40:09+5:30

'पंचायत 3' चं शूटींग करताना नीना गुप्ता का होत्या नाखुष? सिरीजमध्ये नीना यांनी मंजू देवीची भूमिका साकारली आहे (panchayat 3, neena gupta)

Panchayat 3 webseries neena gupta unhappy while shooting know the reason | 'पंचायत 3'चं शूटींग करताना नीना गुप्ता होत्या नाराज, कारण...

'पंचायत 3'चं शूटींग करताना नीना गुप्ता होत्या नाराज, कारण...

 'पंचायत 3' सिरीज काल २८ मेला रिलीज झाली. या सिरीजला अल्पावधीतच प्रेक्षकांची चांगली लोकप्रियता मिळाली.  'पंचायत 3' मध्ये पुन्हा एकदा मंजू देवी, सचिवजी, विकास, प्रल्हाद आणि रिंकी यांची कहाणी बघायला मिळतेय. 'फुलेरा'मधल्या या हलक्याफुलक्या कहाणीला प्रेक्षकांचं पुन्हा एकदा प्रेम मिळतंय. पण 'पंचायत 3'चं शूटींग करताना नीना गुप्ता यांना मात्र नाराजी सहन करावी लागली. काय घडलेलं नेमकं?

'पंचायत 3' चं शूटींग करताना नीना गुप्ता नाराज

'पंचायत 3' चं शूटींग कडक उन्हाळ्यात सुरु होतं. यावेळी ज्या गावात 'पंचायत 3'चं शूटींग चालू होतं तिथे उष्णता खूप होती. त्यामुळे उकाड्याने कलाकार हैराण झाले होते. नीना गुप्तांना या गरमीचा जास्तच त्रास झाला. ४७ डिग्री तापमानात शूटींग करताना नीना गुप्ता या नाराज झाल्या होत्या. एका क्षणी शॉटसाठी रेडी होताना नीना गुप्ता यांच्या डोक्यावरची छत्री काढण्यात आली. परंतु कॅमेरा सेटअप करायला वेळ लागला. त्यामुळे नीना गुप्ता यांची उन्हात चीडचिड झाली. कितीही त्रास झाला तरीही 'पंचायत 3' साठी नीना गुप्ता यांनी शूटींग पूर्ण केलं.

'पंचायत 3' बद्दल थोडंसं...

'पंचायत 3' बद्दल सांगायचं तर.. नीना गुप्तांनी वेबसिरीजमध्ये मंजूदेवीची भूमिका साकारली आहे. सिरीजमध्ये नीना गुप्ता आणि रघुवीर यादव या नवराबायकोची केमिस्ट्री चांगलीच गाजली. 'पंचायत 3'मध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, सान्विका, फैसल मलिक, चंदन रॉय हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. आधीच्या दोन भागांच्या घवघवीत यशानंतर 'पंचायत 3' पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज आहे.

Web Title: Panchayat 3 webseries neena gupta unhappy while shooting know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.