"देख रहा है बिनोद" म्हणणाऱ्या 'पंचायत'च्या भूषणचं नशीब उजळलं, मुंबईत स्वतःचं घर घेतलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 11:29 IST2024-08-01T11:27:53+5:302024-08-01T11:29:05+5:30
'पंचायत' वेबसीरिज गाजवणाऱ्या दुर्गेश कुमारने मुंबईत स्वतःचं घर घेतलं असून लोकांनी त्याचं अभिनंदन केलंय (panchayat 3)

"देख रहा है बिनोद" म्हणणाऱ्या 'पंचायत'च्या भूषणचं नशीब उजळलं, मुंबईत स्वतःचं घर घेतलं!
'पंचायत' वेबसीरिज चांगलीच गाजली. या वेबसीरिजचे तीनही सीझन प्रेक्षकांच्या चांगलेच पसंत पडले. या तीन सीझनमध्ये जास्त चर्चा झाली ती म्हणजे भूषणची भूमिका साकारणारा अभिनेता दुर्गेश कुमारची. दुर्गेशने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेतलंय. इतकी वर्ष मुंबईत स्ट्र्गल केल्यावर 'बनराकस'ने मुंबईत स्वतःसाठी घर घेतलंय. घराच्या चावीचा फोटो शेअर करत दुर्गेशने ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केलीय.
दुर्गेशने मुंबईत स्वतःचं घर घेतलं
दुर्गेश कुमारने इंन्स्टाग्रामवर चावीचा फोटो दाखवला आहे. या फोटोखाली त्याने कॅप्शन लिहिलंय की, "मुंबईमध्ये स्वतःचं घर... धन्यवाद... बापूजी हरेकृष्ण चौधरी तुमचा आशीर्वाद.." असं कॅप्शन देत दुर्गेशने हा आनंद सर्वांसोबत शेअर केलाय. दुर्गेशचं अभिनंदन करताना चाहत्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. एक युजर लिहितो, "पश्चिम फुलेरामध्ये आणखी एक घर." आणखी एका युजरने कमेंट केलीय की, "अरे ये भूटकून इस बात पर दो चाय." अशा कमेंट करत चाहत्यांनी दुर्गेशचं अभिनंदन केलंय.
भूषण खऱ्या आयुष्यात सिंगल, कुटुंब कुठे राहतं?
दुर्गेश कुमारचा स्ट्रगलचा काळ मागे सरुन तो आता मुंबईत सेटल झालाय, असं म्हणायला हरकत नाही. सध्या तरी दुर्गेश मुंबईत एकटाच. त्याचं कुटुंब दरभंगा गावात राहतं. त्याचं अजून लग्न झालं नाही. त्याचे आई-बाबा त्याच्यासाठी स्थळ शोधत आहेत. दुर्गेशने आजवर विविध सिनेमे आणि सीरिजमध्ये काम केलंय. दुर्गेशला खरी प्रसिद्धी 'पंचायत'मधील भूषणच्या भूमिकेतून मिळाली. 'देख रहा है बिनोद' हा दुर्गेशचा डायलॉग खूपच फेमस झाला. त्यावर तयार झालेले मीम्स व्हायरल झाले.