पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना भावली डॉ.मोहन आगाशेंची वेबसीरिज 'दो गुब्बारे'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 06:18 PM2023-08-07T18:18:27+5:302023-08-07T18:19:27+5:30
'दो गुब्बारे' वेबसीरिजमधील हलकी-फुलकी नात्यांची रेशीमगाठ जोडणारी कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांची वेबसीरिज दो गुब्बरे नुकतीच जिओ सिनेमावर रिलीज झाली आहे. कथेबद्दल सांगायचे तर इंदूर शहरातून तरुण नोकरी साठी पुणे शहरात येतो. तिथे तो भाड्याने एका वृद्ध घरमालकासोबत त्याच्याच घरात राहतो. यादरम्यान त्या दोघांमधले संवाद, हळू हळू खुळणारे नाते, विचारांची देवाणघेवाण अशी साधी सरळ कहाणी. ओटीटी प्लॅटफॉर्मवर बऱ्याच काळानंतर अशी हलकी-फुलकी नात्यांची रेशीमगाठ जोडणारी कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेच पण अजुन विशेष म्हणजे उस्ताद पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनाही ही सुंदर कथा खूप आवडली आहे.
त्यांचा एक व्हिडिओ आऊट झाला आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, आजच्या काळात एवढी सोपी सुंदर कथा ज्या साधेपणाने साकारली आहे ते पाहून मी थक्क झालो आहे. मी अनेक वर्षांपासून संगीताच्या माध्यमातून चित्रपटांशी निगडीत आहे. लेखिका कल्याणी यांनी लिहिलेली ही कथा अतिशय सुंदर आहे , संगीत, दिग्दर्शन ही अप्रतिम आहे. मी अशी कथा खूप वर्षांनी बघितली आहे. सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा आणि मी आशा करतो भविष्यातही अशा कथा घडत राहाव्यात अशी माझी इच्छा आहे.
वरूण नार्वेकर दिग्दर्शित, डॉ.मोहन आगाशे आणि सिद्धार्थ शॉ अभीनित जिओ स्टुडिओच्या दो गुब्बारे वेब सीरिजचे पंडित श्री हरिप्रसाद चौरसिया यांनी स्तुती केली आहे हे कौतकास्पद आहे