पुन्हा दरवाजे उघडणार..! बहुचर्चित 'पाताल लोक २'ची रिलीज डेट जाहीर; कधी अन् कुठे बघाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 13:48 IST2024-12-23T13:47:38+5:302024-12-23T13:48:05+5:30
लॉकडाउनमध्ये गाजलेल्या पाताललोकचा दुसरा सीझन या तारखेला ओटीटीवर रिलीज होणार आहे. क्लिक करुन जाणून घ्या (patal lok 2)

पुन्हा दरवाजे उघडणार..! बहुचर्चित 'पाताल लोक २'ची रिलीज डेट जाहीर; कधी अन् कुठे बघाल?
'पाताललोक' वेबसीरिज सर्वांना आठवत असेलच. लॉकडाउनमध्ये रिलीज झालेल्या 'पाताललोक' वेबसीरिजने प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळवलं. वेबसीरिजचा वेगळा विषय, कथानकाची अनोखी मांडणी अशा अनेक गोष्टींमुळे 'पाताललोक' वेबसीरिज लोकांच्या पसंतीस उतरली. आता 'पाताललोक'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे या वेबसीरिजचा पुढचा सीझन अर्थात 'पाताललोक २'च्या रिलीज डेटची घोषणा झाली आहे. जाणून घ्या.
'पाताललोक २' कधी रिलीज होणार
प्राइम व्हिडीओने त्यांच्या सोशल मीडियावर 'पाताललोक २'च्या रिलीज डेटची घोषणा केलीय. ही वेबसीरिज १७ जानेवारी २०२५ ला रिलीज होणार आहे. 'नवीन वर्षात दरवाजे उघडणार..' अशी टॅगलाइन देत 'पाताललोक २'च्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आलीय. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना 'पाताललोक २'च्या निमित्ताने एक आशयघन वेबसीरिज बघायला मिळेल, यात शंका नाही.
'पाताललोक २' कुठे बघाल?
प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'पाताललोक २' तुम्हाला बघायला मिळेल. पहिल्या सीझनप्रमाणे 'पाताललोक २'चं दिग्दर्शन सुद्धा अविनाश अरुण यांनी केलंय. पहिल्या सीझनप्रमाणे याही सीझनमध्ये जयदीप अहलावत प्रमुख भूमिकेत आहे. जयदीप यांच्यासोबत अभिनेत्री तिलोत्तमा शोमे झळकणार आहे. या दोघांशिवाय आणखी कोणते कलाकार झळकणार, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आता सर्वांना १७ जानेवारी २०२५ ची उत्सुकता आहे.