मिकेश-तान्याची जोडी! Permanent Roommates चा तिसरा सिझन 'या' दिवशी रिलीज होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 16:17 IST2023-10-11T16:16:20+5:302023-10-11T16:17:25+5:30
सर्वांची लाडकी मिकेश आणि तान्याची जोडी परत येत आहेत.

मिकेश-तान्याची जोडी! Permanent Roommates चा तिसरा सिझन 'या' दिवशी रिलीज होणार
ओटीटीवरील रोमँटिक ड्रामा 'पर्मनंट रुममेट्स' चा तिसरा सिझन लवकरच रिलीज होत आहे. याचा अर्थ सर्वांची लाडकी मिकेश आणि तान्याची जोडी परत येत आहेत. 'पर्मनंट रुममेट्स' (Permanent Rommates) च्या पहिल्या दोन्ही सिझनला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. तर आता तिसऱ्या सिझनच्या घोषणेमुळे चाहत्यांची उत्सुकता ताणली आहे.
कुठे आणि कधी पाहता येणार नवी सिझन
'पर्मनंट रुममेट्स 3' ही सिरीज २४० पेक्षा जास्त देशांमध्ये रिलीज होत आहे. प्राईम व्हिडिओवर सिरीज पाहता येणार आहे. तसंच रिलीजची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या १८ ऑक्टोबरला मिकेश आणि तान्या चाहत्यांच्या भेटीस येत आहेत.
दिग्दर्शक श्रेयांश पांडे म्हणाले,'पर्मनंट रुममेट्सच्या नवीन सिझनची घोषणा करताना खूप आनंद होत आहे. ही सीरिज नेहमीच आमच्यासाठी खास राहिली आहे. याच शोने २०१४ मध्ये वेब क्रांतीची सुरुवात केली. मिकेश आणि तान्याला तुम्ही जे अद्भूत प्रेम दिलं त्यानंतर आता हा नवा सिजन तुमच्यासमोर प्रस्तुत करण्यासाठी आम्ही आतुर आहोत.
ते पुढे म्हणाले,'ही सीरिज पुन्हा दर्शकांसमोर आम्ही घेऊन येत आहोत. तुम्हाला पुन्हा एकदा मिकेश आणि तान्याच्या जगात घेऊन जात आहोत. २४० पेक्षा जास्त देशांतील लोकांना सीरिज पाहता येणार आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे.'