प्रिया बापट आणखी एका हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार, सुमित व्यास करणार दिग्दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 18:38 IST2024-03-13T18:37:37+5:302024-03-13T18:38:17+5:30
हिंदी टेलिव्हिजनवरील रोमँटिक हिरो वरुण सोबतीसोबत ती झळकणार आहे.

प्रिया बापट आणखी एका हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार, सुमित व्यास करणार दिग्दर्शन
मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) लवकरच एका हिंदी प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. प्रियाने याआधी हिंदीत काम केलं असून हा तिचा आणखी एक प्रोजेक्ट आहे. 'इस प्यार को क्या नाम दूँ' फेम वरुण सोबती, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेली अंजील आनंद यामध्ये असणार आहेत. 'रात जवान है' असं वेब शोचं नाव आहे. सध्या शोच्या कास्टचे सेटवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
'रात जवान है' हा रोमँटिक कॉमेडी शो आहे. 'परमनंट रुममेट्स' फेम सुमित व्यासने वेब शोचं दिग्दर्शन केलं आहे. यामिनी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडने शो निर्मित केला आहे. या शोविषयी सुमित व्यास म्हणाला, "लोकांना वाटतं आईवडील झाल्यानंतर तुमचं तारुण्य संपतं, पण आम्ही या शोमधून तोच भ्रम दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत."
तो पुढे म्हणाला, "ही तीन मित्रांची गोष्ट आहे जे मुलं झाल्यानंतरही वेळ काढून भेटतात आणि मित्रांसोबतचा वेडेपणा जपतात. वरुण, अंजली आणि प्रियासोबत काम करुन मला खूप मजा आली. लोकांनाही हा शो आवडेल अशी आशा आहे.'
सीरिजच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. सोनी लिव्ह वर सीरिज प्रदर्शित होणार आहे. प्रियाने याआधी 'सिटी ऑफ ड्रीम्स' या सीरिजमध्ये काम केलं आहे. नुकताच या सीरिजचा तिसरा पार्ट रिलीज झाला.