'मला जूही चावलासोबत लग्न करायचं होतं...' आर माधवनचा खुलासा, अभिनेत्रीची अशी प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 01:44 PM2023-11-22T13:44:45+5:302023-11-22T13:46:11+5:30
आर माधवनचं एकच ध्येय होतं ते म्हणजे जूहीशी लग्न करणं.
सर्वांचा लाडका 'मॅडी' म्हणजेच अभिनेता आर माधवनने (R Madhavan) नुकताच एक खुलासा केला आहे. जूही चावलासोबत त्याला थेट लग्न करायची त्याची इच्छा होती असं तो म्हणाला. इतकंच नाही तर त्याने त्याच्या आईकडे ही इच्छाही व्यक्त केली होती. लग्न करायचं तर जूही चावलाशीच (Juhi Chawla) असं तो आईला म्हणाला होता. हा नक्की काय किस्सा आहे जाणून घ्या.
नुकत्याच रिलीज झालेल्या नेटफ्लिक्स सीरिज 'द रेलवे मॅन' मध्ये जूही चावलासोबत आर माधवन काम केलं आहे. सीरिजच्या प्रमोशनदरम्यान आर माधवन म्हणाला,'मी जूहीजी आणि सर्वांसमोर हे कबूल करु इच्छितो की कयामत से कयामत तक बघितल्यानंतर मला जूही चावलासोबत लग्न करण्याची इच्छा होती. माझं ते एकच ध्येय होतं की काहीही करुन मी त्यांच्याशी लग्न करावं. मी आईलाही हे सांगून टाकलं होतं.'
'द रेलवे मॅन' सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. यामध्ये के के मेनन , बाबिल खान यांचीही मुख्य भूमिका आहे. सीरिज मधील सर्व कलाकारांचं नुकतंच राऊंड टेबल झालं. यामध्ये त्यांनी गप्पा मारल्या तेव्हा आर माधवनने याचा खुलासा केला. हे ऐकताच समोरच बसलेली जूही लाजली.
'कयामत से कयामत तक' मध्ये जूही आणि आमिर खान लीड रोल मध्ये होते. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. तसंच आमिर खान आणि जूही एका रात्रीत स्टार झाले होते.