RaanBaazaar : " ऐकून छान वाटतयं !..", तेजस्विनी पंडितची नवी पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 01:18 PM2022-06-06T13:18:03+5:302022-06-06T13:21:04+5:30
Raanbaazaar : सध्या तेजस्विनी तिच्या रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत येत आहे. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच तेजस्विनीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला.
‘रानबाजार’ या वेबसीरिजने गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या सीरिजच्या निमित्ताने अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित या दोघींनी एकत्र स्क्रीन शेअर केली. प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज पहिल्यांदा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. यात अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. सध्या तेजस्विनी पंडितची एक नवी पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
तेजस्विनी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तेजस्विनीने रानाबाजार वेबसिरीज संदर्भातील एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यासोबत ती आयशाच्या भूमिकेतील तीन फोटोदेखील शेअर केले आहेत. ऐकून छान वाटतयं ! तुम्हाला Ayesha ची कहाणी आवडतेय....बघितली का? 'रानबाजार' 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर ! असं तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. यावर चाहत्यांनी हो खरंच खूप छान अभिनय आणि बेस्ट वेबसिरिज्. सगळे भाग पाहिले, खूप छान सुरू आहे आणि कथानक उत्तम आहे , अभिनय लाजवाब, मी ८ एपिसोड पाहिले आता नेक्स्टची उत्सुकता आहे. अशा कमेंट्स येतेय.
लोकमतशी बोलताना तेजस्विनी म्हणाली, कलाकार म्हणून आता मी ट्रोलिंगच्या पुढे गेली, मी माझा दृष्टीकोन बदलला आहे. त्यामुळे या सगळ्याकडे मी निगेटिव्ह दृष्टीकोनातून पाहत नाही. मला वाटत नाही टीझर किंवा ट्रेलरमध्ये काही नेगिटीव्ह होते परंतु ते लोकांनी निगेटिव्ह घेतल्यामुळे ते जास्त व्हायरल झाले. हरकत नाही ते व्हायरल झालं म्हणून लोकांनी ते बघितलं. अभिनेत्री म्हणून मला कपडेच काढायचं असते तर ते मी कुठल्याही गाण्यावर केले असते. एक बोल्ड सीन पाहून ट्रोलिंग करणं योग्य नाही.
दरम्यान, प्राजक्ता माळी, मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, उर्मिला कोठारे, वैभव मांगले, अनंत जोग, अभिजित पानसे, गिरीश दातार, निलेश दिवेकर, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता खरात आणि माधुरी पवार हे दिग्गज कलाकार या सीरिजमध्ये झळकले आहेत. अभिजित पानसे दिग्दर्शित 'रानबाजार' या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठी अक्षय बर्दापूरकर, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी, रावण फ्युचर प्रॉडक्शन यांनी केली आहे.