'फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट'मध्ये आरजे मलिष्का दिसणार सरोजिनी नायडू यांच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 06:58 PM2024-05-14T18:58:20+5:302024-05-14T18:58:52+5:30

Freedom at Midnight : ‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट’ या राजकीय थरारनाट्यामध्ये आरजे मलिष्का मेन्डोसा सरोजिनी नायडू यांची भूमिका साकारणार आहे, राजेश कुमार लियाकत अली खान यांच्या भूमिकेत दिसणार आहे तर केसी शंकर व्ही.पी. मेनन यांची भूमिका साकारणार आहे.

RJ Malishka will be seen in the role of Sarojini Naidu in 'Freedom at Midnight' | 'फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट'मध्ये आरजे मलिष्का दिसणार सरोजिनी नायडू यांच्या भूमिकेत

'फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट'मध्ये आरजे मलिष्का दिसणार सरोजिनी नायडू यांच्या भूमिकेत

‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट’ या आपल्या बहुप्रतिक्षित शोमधील कलाकारांच्या यादीत आणखी काही नावे दाखल केल्याची घोषणा केली आहे. या राजकीय थरारनाट्यामध्ये आरजे मलिष्का मेन्डोसा सरोजिनी नायडू यांची भूमिका साकारणार आहे, राजेश कुमार लियाकत अली खान यांच्या भूमिकेत दिसणार आहे तर केसी शंकर व्ही.पी. मेनन यांची भूमिका साकारणार आहे. 

स्वातंत्र्यचळवळीच्या काळामध्ये सरोजिनी नायडू, व्हीपी मेनन आणि लियाकत अली खान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या चळवळीमधील एक ठळक स्त्री नेतृत्व असलेल्या नायडू यांनी भारताच्या मुक्ततेचा पुरस्कार केला तसेच त्या आपल्या कवितांसाठी तसेच आंदोलनातील सहभागासाठीही ओळखल्या जातात. मेनन यांनी घटनात्मक सल्लागार म्हणून संस्थानांना स्वतंत्र भारतामध्ये विलीन करण्याच्या कामी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. मुहम्मद अली जिना यांचे जवळचे सहकारी लियाकत हे फाळणीच्या वाटाघाटींमधील एक महत्त्वाचे नेते होते मात्र पंतप्रधान म्हणून त्यांना विदारक शेवटाला सामोरे जावे लागले. यातील प्रत्येक व्यक्तीमत्त्वाने भारत आणि पाकिस्तानच्या राजकीय पटलावर कधीही न मिटणारा ठसा उमटवला आहे. 

सरोजिनी नायडू यांची भूमिका साकारण्याविषयी मलिष्का म्हणाली, “फ्रीडम अ‍ॅट मिडनाइटमध्‍ये नाइटिंगेल ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरोजिनी नायडू यांची भूमिका साकारताना माझ्या मनात खरोखरीच विनम्रतेची भावना आहे. त्यांची भूमिका साकारणे हे एक आव्हान आहे आणि गौरवाची बाब आहे, ही भूमिका करण्यासाठी त्यांच्याविषयी वाचनात आलेल्या गोष्टी आणि मी त्यांच्याबद्दल आमच्या दिग्दर्शकाबरोबर केलेली चर्चा एवढेच संदर्भबिंदू माझ्याकडे आहेत. मला वाटतं त्या भारताच्या आधुनिक स्त्रीच्या ख-याखु-या प्रतिनिधी होत्या, ज्यांनी कोणत्याही मर्यादांच्या चौकटीत स्वत:ला अडकवून घेतलं नाही. त्या एक लोकप्रिय कवयित्री आणि स्वातंत्र्यसैनिक होत्याच पण त्याचबरोबर महिलांना राजकारणात येण्यासाठी मार्ग तयार करून देणा-या नेत्याही होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्वातील गुंतागूंतीचा अधिक खोलात जाऊन वेध घेणे आणि आपल्या देशाच्या इतिहासातील इतक्या परिवर्तनशील कालखंडादरम्यान त्यांचा प्रवास समजून घेणे हे भारावून टाकणारे आहे. या मालिकेचा भाग बनणे म्हणजे इतिहासात मागे जाण्यासारखे व इतिहासाला त्याच्या सर्वाधिक नैसर्गिक रूपामध्ये अनुभवण्यासारखे आहे.”
इमाय एंटरटेनमेन्टने (मोनिषा अडवाणी आणि मधु भोजवानी) स्टुडिओनेक्स्ट आणि सोनी लिव्‍हच्या सफ्रीडम अ‍ॅट मिडनाइटची निर्मिती केली आहे व निखिल अडवानी या मालिकेचे शो रनर आणि दिग्दर्शक आहेत. अभिनंदन गुप्ता, अद्वि‍तीय कारंग दास, गुनदीप कौर, दिव्य निधी शर्मा, रेवंत साराभाई आणि इथन टेलर यांच्या लेखणीतून ही कहाणी साकारली आहे. 

Web Title: RJ Malishka will be seen in the role of Sarojini Naidu in 'Freedom at Midnight'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.