सई ताम्हणकरचा नॉन ग्लॅमरस लूक चर्चेत, लवकरच दिसणार वेगळ्या अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 04:29 PM2024-09-16T16:29:00+5:302024-09-16T16:29:51+5:30

Saie Tamhankar : सई ताम्हणकर सोनी लिव्हवर मानवत मर्डर्स सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये ती समिंद्रीची भूमिका साकारताना दिसणार आहे. सईचा यातील नॉन ग्लॅमरस लूक सध्या चर्चेत आला आहे.

Saie Tamhankar's non-glamorous look in the news, will soon be seen in a different look | सई ताम्हणकरचा नॉन ग्लॅमरस लूक चर्चेत, लवकरच दिसणार वेगळ्या अंदाजात

सई ताम्हणकरचा नॉन ग्लॅमरस लूक चर्चेत, लवकरच दिसणार वेगळ्या अंदाजात

अभिनेत्री सई ताम्हणकर(Saie Tamhankar)ला कोणत्याच परिचयाची गरज नाही. तिने मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. सई नेहमीच हटके भूमिका साकारताना दिसते. आता ती लवकरच एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ती लवकरच सोनी लिव्हवर मानवत मर्डर्स सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये ती समिंद्रीची भूमिका साकारताना दिसणार आहे. सईचा यातील नॉन ग्लॅमरस लूक सध्या चर्चेत आला आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर हिने नुकतेच मानवत मर्डर्स या सीरिजमधील तिचे फोटो शेअर केले आहेत. तिने फोटो शेअर करत लिहिले की, थोडं तिचं, थोडं माझं! समिंद्री, सई. यात सई पिंक रंगाची नववारी साडी नेसली आहे. तिच्या हातात कोकरू आहे. तिचा हा लूक चाहत्यांना खूप भावतो आहे. तिचा हा लूक पाहून ते सीरिज पाहण्यासाठी उत्सुक आहेत.


१९७०च्या दशकामध्ये महाराष्ट्राला हादरवणाऱ्या कुप्रसिद्ध शोकांतिकाचा मागोवा या मालिकेमधून घेतला जाणार आहे. या मालिकेमध्ये भारताचे शेरलॉक होल्म्स म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध सीआयडी अधिकारी रमाकांत एस कुलकर्णी यांची आपल्या कामाप्रती अविचल बांधिलकी, चिकाटी आणि गुंतागूंतीची प्रकरणे सोडविण्याचे त्यांचे कौशल्य यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.


फूटप्रिंट्स ऑन द सँड ऑफ क्राइम रमाकांत कुलकर्णी यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकावर आधारित या मालिकेमध्ये आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर यांच्यासह अनेक लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत. 'मानवत मर्डर्स' ४ ऑक्टोबरपासून भेटीला येणार आहे. 
 

Web Title: Saie Tamhankar's non-glamorous look in the news, will soon be seen in a different look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.