'हिरामंडी'साठी प्रेक्षकांना करावी लागणार प्रतीक्षा; 'या' कारणामुळे रिलीज डेटमध्ये होणार बदल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 18:25 IST2023-05-24T18:24:19+5:302023-05-24T18:25:39+5:30
Heeramandi: या सीरिजचं प्रदर्शन लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे. यामागचं कारण नुकतंच समोर आलं आहे.

'हिरामंडी'साठी प्रेक्षकांना करावी लागणार प्रतीक्षा; 'या' कारणामुळे रिलीज डेटमध्ये होणार बदल?
भव्यदिव्य सेट, दर्जेदार कथानक आणि कलाकारांचे महागडे कपडे यांसाठी खासकरुन ओळखले जाणारे लोकप्रिय दिग्गदर्शक म्हणजे संजय लीला भन्साळी. हम दिल दे चुके सनम असो, देवदास वा गंगुबाई काठियावाडी संजय भन्साळी यांचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. विशेष म्हणजे रुपेरी पडदा गाजवल्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळवला आहे. लवकरच त्यांची हिरामंडी (Heeramandi) ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या सीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र, या सीरिजचं प्रदर्शन लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे. यामागचं कारण नुकतंच समोर आलं आहे.
संजय लीला भन्साळी यांची पहिली सीरिज
आजवर असंख्य सिनेमे सुपरहिट दिल्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा ओटीटीवर वळवला आहे. हिरामंडी ही त्यांची पहिली वेबसीरिज असून नेटफ्लिक्सवर ती प्रदर्शित होणार आहे.
पुन्हा होणार हिरामंडीचं शुटिंग?
सूत्रांच्या माहितीनुसार, हिरामंडी ही एक पीरियड ड्रामा वेब सीरिज आहे. या सीरिजच्या काही सीनचं मुंबईत शुटींग झाला आहे. परंतु, यातील काही सीन संजय लीला भन्साळी यांना आवडले नाहीत. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा या सीनचं शुटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
या अभिनेत्री झळकणार महत्त्वपूर्ण भूमिकेत
या सीरिजमध्ये ऋचा चड्ढा, सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, अदिती राव हैदरी आणि संजीदा शेख महत्त्वपूर्ण भूमिकेत झळणार आहे.