Shashank Ketkar : शशांक केतकरसाठी २०२३ आहे खास; पोस्ट शेअर करत दिली 'गुडन्यूज'; एका मोठ्या 'स्कॅम'साठी तयार राहा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 10:56 AM2023-01-02T10:56:29+5:302023-01-02T10:58:28+5:30

२०२२ वर्ष हे मस्तच गेलं आणि २०२३ हे नवीन वर्षही छान असेल. शशांकची पोस्ट चर्चेत.

shashank-ketkar-shared-post-2023-will-be-wonderful-year-for-him-he-will-be-seen-in-scam-2003 | Shashank Ketkar : शशांक केतकरसाठी २०२३ आहे खास; पोस्ट शेअर करत दिली 'गुडन्यूज'; एका मोठ्या 'स्कॅम'साठी तयार राहा

Shashank Ketkar : शशांक केतकरसाठी २०२३ आहे खास; पोस्ट शेअर करत दिली 'गुडन्यूज'; एका मोठ्या 'स्कॅम'साठी तयार राहा

googlenewsNext

Shashank Ketkar :  २०२० मध्ये आलेल्या स्कॅम १९९२ (Scam 1992) या वेब सिरीजने ओटीटी क्षेत्रात धुमाकूळ घातला. प्रसिद्ध दिग्दर्शक हन्सल मेहता (Hansal Mehta) यांनी काढलेल्या या सिरीजने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यातील मुख्य अभिनेता प्रतिक गांधीच्या (Pratik Gandhi) अभिनयाने तर सर्वांचे मन जिंकले. आता हन्सल मेहता हे आणखी एका घोटाळ्यावर सिरीज घेऊन येत आहेत. आणि यात मराठी अभिनेता, सर्वांचा लाडका श्री म्हणजेच शशांक केतकरही भूमिका साकारणार आहे. शशांकची नवीन वर्षाची सुरुवात नक्कीच खूप खास आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत  ही गूडन्यूज दिली आहे.

शशांकने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले, ' २०२२ वर्ष हे मस्तच गेलं आणि २०२३ हे नवीन वर्षही छान असेल.' शशांकने एक फोटो पोस्ट केला आहे. त्यावर क्लॅपबोर्ड दिसत असून SCAM 2003 असे लिहिले आहे. हन्सल मेहता यांचेही नाव आहे. 

तर हन्सल मेहता आणखी एका घोटाळ्यावर सिरीज घेऊन येत आहेत. शशांकच्या पोस्टवरुन कळते की सिरीजच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. २००३ मध्ये झालेला तेलगी घोटाळा प्रचंड गाजला होता. तेलगी घोटाळ्याची संपूर्ण कहाणी हन्सल मेहता आपल्या सिरीजमधून दाखवणार आहेत. अप्लॉज एंटरटेनमेंटने 'स्कॅम २००३ : द तेलगी स्टोरी' (Scam 2003 : The  Telgi Story) या सिरीजची घोषणा केली आहे. अभिनेता शशांक केतकरही सिरीजचा भाग असणार आहे. सध्या शशांक स्टार प्रवाह वरील 'मुरांबा' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.

'स्कॅम : २००३ द तेलगी स्टोरी' अब्दुल करीम तेलगी च्या जीवनावर आधारित आहे. कर्नाटकचा अब्दुल तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यामागचा मास्टरमाईंड आहे. या घोटाळ्याने अख्खा देश हादरुन गेला होता. या घोटाळ्यामुळे देशाचे २० हजार कोटींचे नुकसान झाले. 

Web Title: shashank-ketkar-shared-post-2023-will-be-wonderful-year-for-him-he-will-be-seen-in-scam-2003

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.