शिवांगी जोशीला होती 'हीरामंडी'ची ऑफर? नेपोटिझममुळे रातोरात झाली रिप्लेस; चाहते भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 03:37 PM2024-07-28T15:37:31+5:302024-07-28T15:38:25+5:30

शिवांगीने नाव न घेता दिली हिंट

Shivangi Joshi was offered a series and was finalized but suddenly she got relaced | शिवांगी जोशीला होती 'हीरामंडी'ची ऑफर? नेपोटिझममुळे रातोरात झाली रिप्लेस; चाहते भडकले

शिवांगी जोशीला होती 'हीरामंडी'ची ऑफर? नेपोटिझममुळे रातोरात झाली रिप्लेस; चाहते भडकले

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शिवांगी जोशीने (Shivangi Joshi)  नुकताच एक खुलासा केला. संजय लीला भन्साळींच्या गाजलेल्या 'हीरामंडी' सीरिजसाठी आधी तिला ऑफर मिळाली होती. मात्र रातोरात तिला या सीरिजमधून रिप्लेस करण्यात आलं. विशेष म्हणजे सीरिजमधील अभिनेत्री शर्मिन सेगल जी तिच्या अभिनयामुळे खूप ट्रोल झाली याच भूमिकेसाठी शिवांगीला ऑफर मिळाली होती. नक्की काय म्हणाली शिवांगी जाणून घेऊया.

'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत शिवांगी जोशीने 'हीरामंडी' सीरिजचं नाव घेतलं नाही. मात्र तिचा रोख त्याच सीरिजकडे असल्याची दाट शक्यता आहे. शिवांगी म्हणाली, "एका वेबसीरिजसाठी मला कॉल आला. माझी ऑडिशन झाली. सगळं काही झालं. त्यांना माझा परफॉर्मन्स आवडला आणि मला फायनलही केलं गेलं. अचानक मला कळलं की मला रिप्लेस करण्यात आलं आहे. मी विचार केला की हे कधी झालं कारण काल तर मी फायनल झाले होते. तर ते म्हणाले की कोणाच्या तरी मुलीला आता हा रोल मिळाला आहे. नंतर मला तिच्या मैत्रिणीची  भूमिका करण्यासाठी विचारलं गेलं."

शिवांगीच्या या मुलाखतीनंतर सर्वांनीच ही सीरिज 'हीरामंडी' असल्याचा अंदाज लावला. तसंच शिवांगीने उलट उत्तम काम केलं असतं पण नेपोटिझममुळे तिला मिळाला नाही अशाही कमेंट्स केल्या.  शिवांगीचे चाहते सोशल मीडियावर तिच्या सपोर्टमध्ये आले आहेत. 

शिवांगी सध्या अभिनेता कुशल टंडनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. दोघंही थायलंडमध्ये बॉॉक्सिंग मॅच पाहताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. कुशल तिकडे मार्शल आर्ट्सचं शिक्षण घेत आहे. यामुळे शिवांगी अनेकदा थायलंडमध्ये असते.

Web Title: Shivangi Joshi was offered a series and was finalized but suddenly she got relaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.