'मिर्झापूर'चा क्लायमॅक्स पाहून आई सुप्रिया पिळगावकरांना काय वाटलं? श्रिया म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 03:30 PM2024-07-09T15:30:26+5:302024-07-09T15:31:08+5:30
'मिर्झापूर'च्या पहिल्या सीझनचा रक्तरंजित शेवट पाहून आईची प्रतिक्रिया काय होती याविषयी श्रियाने खुलासा केलाय (shriya pilgaonkar)
'मिर्झापूर'च्या तिसऱ्या सीझनची सध्या चांगलीच चर्चा आहे. 'मिर्झापूर' चा तिसरा सीझन पाहून अनेक संमिश्र प्रतिक्रिया बाहेर येत आहेत. 'मिर्झापूर'चा पहिला सीझन यशस्वी होण्यामागे एका मराठमोळ्या अभिनेत्रीचंही तितकंच योगदान आहे. ही अभिनेत्री म्हणजे श्रिया पिळगावकर. श्रियाचे आई-बाबा म्हणजेच सुप्रिया-सचिन पिळगावकर लोकप्रिय अभिनेते आहेत हे आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. अशातच श्रियाने एका मुलाखतीत 'मिर्झापूर'चा पहिला सीझन पाहिल्यावर आईची प्रतिक्रिया काय होती, याविषयी खुलासा केलाय.
आईला सीरिज पहायची नव्हती पण..: श्रिया
श्रियाने बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, “मला आठवतं, आईला ‘मिर्झापूर’ बघायला जमत नव्हतं. कारण हा खूप हिंसक कार्यक्रम आहे. पण ही माझी पहिली वेबसीरिज होती. त्यामुळे हिंसाचार असूनही सीरिजमध्ये मला बघण्यासाठी मी तिला वेबसीरिज पाहण्याची बळजबरी केली. जेव्हा क्लायमॅक्स सीन आला तेव्हा माझी आई चेहऱ्यावर हात ठेऊन लपतछपत तो सीन बघत होती. आता श्रियाला काहीतरी होणार आणि हे मी पाहू शकत नाही, असं म्हणत आई रडायला लागली. मग मी बंद करत तिला शांत केलं."
This is so sweet ♥️
— Shriya Pilgaonkar (@ShriyaP) August 20, 2022
Thank you for making this @theIndwebseries .
Lots more coming soon 🤗🌻#GuiltyMinds#BrokenNews#Mirzapur#MurderInAgondapic.twitter.com/22jW5IeZEx
सुप्रिया यांनी श्रियाचा क्लायमॅक्सचा सीन पाहिला अन्...
हाच किस्सा सांगत श्रिया पुढे म्हणाली, “मला समजले की एवढी हिंसा पाहणं आईसाठी खूप आहे. पण तरीही आईने तो सीन पाहिला आणि ती खूप रडली. मला खूप वाईट वाटले. असे बरेच लोक आहेत जे इतका रक्तपात पाहू शकत नाहीत, परंतु आईने फक्त माझ्यासाठी ते पाहिलं. पुढे आईने माझ्या कामाचं कौतुकही केलं.” ज्यांनी मिर्झापूर बघितलंय त्यांना माहितच असेल की श्रियाला क्लायमॅक्समध्ये मारलं जातं. श्रिया पिळगावकर काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'ब्रोकन न्यूज सीझन २' मध्ये जयदीप अहलावत आणि सोनाली बेंद्रेंसोबत झळकली.