अखेर ३ वर्षांनी Squid Game 2 प्रेक्षकांच्या भेटीला, रिलीज डेट जाहीर, प्रोमो पाहून थरकाप उडेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 10:29 AM2024-08-01T10:29:26+5:302024-08-01T10:29:55+5:30

बहुचर्चित वेबसीरिज #SquidGame2 ची रिलीज डेट जाहीर झालीय. प्रोमोही रिलीज

Squid Game 2 release date announced with promo netflix india video viral | अखेर ३ वर्षांनी Squid Game 2 प्रेक्षकांच्या भेटीला, रिलीज डेट जाहीर, प्रोमो पाहून थरकाप उडेल

अखेर ३ वर्षांनी Squid Game 2 प्रेक्षकांच्या भेटीला, रिलीज डेट जाहीर, प्रोमो पाहून थरकाप उडेल

'स्क्वीड गेम' ही वेबसीरिज चांगलीच गाजली. जेव्हा संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये संकटांचा सामना करत होतं तेव्हा 'स्क्वीड गेम' या वेबसीरिजने प्रेक्षकांना मनोरंजनाचा बूस्टर डोस दिला. २०२१ साली आलेल्या या वेबसीरिजने प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळवलं. या वेबसीरिजच्या दुसऱ्या भागाची अर्थात 'स्क्वीड गेम 2' ची काही महिन्यांपूर्वी घोषणा झाली. पण वेबसीरिजच्या रिलीज डेटबद्दल कोणताही खुलासा झाला नव्हता. अखेर नुकतंच 'स्क्वीड गेम 2'चा प्रोमो भेटीला आलाय. या प्रोमोत वेबसीरिजच्या रिलीज डेटचाही खुलासा केलाय.

'स्क्वीड गेम 2'चा नवीन प्रोमो 

'स्क्वीड गेम 2' चा प्रोमो आज पहाटे रिलीज झालाय. तीन वर्षानंतर गेम खेळायला तयार आहात का? असं या प्रोमोत पाहायला मिळतं. पुढे on your mark अशी घोषणा केली जाते. सर्व स्पर्धक शर्यतीत धावण्यासाठी सज्ज असतात. पण यातील काही स्पर्धक खाली कोसळतात. या सर्वांना मास्क मॅन नियंत्रणात ठेवतो. शेवटी डोळ्यांनी मारणारी बाहुली दिसते. पुढे 'स्क्वीड गेम 2' अशी अक्षरं स्क्रीनवर दिसतात आणि सीरिजची घोषणा केली जाते. 

'स्क्वीड गेम 2' ची रिलीज डेट 

'स्क्वीड गेम 2' ही बहुप्रतिक्षित अन् बहुचर्चित सीरिज २६ डिसेंबर २०२४ ला रिलीज होणार आहे. इतकंच नव्हे 'स्क्वीड गेम 2' च्या मेकर्सने सीरिजच्या फायनल सीझनची घोषणा केलीय. 'स्क्वीड गेम 2' चा फायनल सीझन अर्थात 'स्क्वीड गेम 3' २०२५ ला रिलीज होणार आहे. अशाप्रकारे पहिल्या सीझनला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर 'स्क्वीड गेम 2' मध्ये कोणती कथा दिसणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Web Title: Squid Game 2 release date announced with promo netflix india video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.