प्रतीक्षा संपली! स्क्वीड गेमच्या तिसऱ्या सीझनची घोषणा, 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:01 IST2025-01-31T12:01:01+5:302025-01-31T12:01:25+5:30
'स्क्विड गेम ३' ची रिलीज डेट जाहीर केली आहे.

प्रतीक्षा संपली! स्क्वीड गेमच्या तिसऱ्या सीझनची घोषणा, 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Squid Game Season 3: ओटीटीवर आजवर अनेक कोरियन शो चर्चेत आले आहेत. त्यातच सगळ्यात गाजलेला 'स्क्विड गेम' (Squid Game) ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. जगभरात गाजलेल्या वेब सीरिजपैकी एक 'स्क्विड गेम' असून प्रेक्षक याच्या तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता 'स्क्विड गेम'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नेटफ्लिक्सनं 'स्क्विड गेम'च्या तिसऱ्या सीझची घोषणा झाली आहे. निर्मात्यांनी 'स्क्विड गेम ३' (Squid Game Season 3) ची रिलीज डेट जाहीर केली आहे.
'स्क्विड गेम ३' येत्या २७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. हा सीझन फायनल सीझन असल्याचं बोललं जात आहे. कारण पोस्टरवर 'Prepare For Final Game' म्हणजेच 'अंतिम खेळासाठी तयार व्हा' अशी टॅगलाईन लिहिली आहे.
'स्क्विड गेम' या कोरियन वेब सीरिजचा पहिला सीझन २०२१ साली प्रदर्शित करण्यात आला होता. या सीरिजने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. त्यानंतर या सीरिजच्या दुसऱ्या सीझनसाठी प्रेक्षकांना तब्बल ३ वर्ष वाट पाहावी लागली. २६ डिसेंबर २०२४ ला या सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित करण्यात आला. आता तिसरा सीझनची घोषणा झाल्यानं चाहते आनंदात असून त्यांची उत्कंठा वाढली आहे.