'आश्रम'मधील पम्मी पहलवानसाठी दिग्दर्शकाला अदिती पोहणकरला करायचं नव्हतं कास्ट, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 12:18 IST2025-02-28T12:17:41+5:302025-02-28T12:18:44+5:30

बॉबी देओल(Bobby Deol)ची बहुप्रतीक्षित सीरिज 'आश्रम' (Aashram Web Series) चा नवीन सीझन रिलीज झाला आहे.

The director didn't want to cast Aditi Pohankar as Pammi Pehlwan in 'Aashram', but... | 'आश्रम'मधील पम्मी पहलवानसाठी दिग्दर्शकाला अदिती पोहणकरला करायचं नव्हतं कास्ट, पण...

'आश्रम'मधील पम्मी पहलवानसाठी दिग्दर्शकाला अदिती पोहणकरला करायचं नव्हतं कास्ट, पण...

बॉबी देओल(Bobby Deol)ची बहुप्रतीक्षित सीरिज 'आश्रम' (Aashram Web Series) चा नवीन सीझन रिलीज झाला आहे. 'आश्रम ३' पार्ट २ सध्या एमएक्स प्लेअरवर प्रसारीत होत आहे. दरम्यान आश्रमचे दिग्दर्शक प्रकाश झा यांनी या सीरिजमध्ये अदिती पोहणकरच्या निवडीबद्दलचा किस्सा सांगितला. सुरुवातीला त्यांना पम्मी पहलवानच्या भूमिकेसाठी अदिती पोहणकरला कास्ट करायचे नव्हते, असे प्रकाश झा यांनी सांगितले.  

एएनआईशी बोलताना प्रकाश झा यांनी सांगितले की, अदिती पोहणकरच्या कास्टिंगबाबत मला खात्री नव्हती. मला तिच्यात काहीतरी दिसले होते पण मला विश्वास नव्हता की, ती ही भूमिका कशी साकारेल. शूटिंगच्या आधी एक समस्या आली. पहलवानाच्या भूमिकेसाठी ती खूप बारीक होती. मात्र तिने या भूमिकेसाठी ती वजन वाढवेल, असे सांगितले. प्रकाश झा यांनी तिला त्यावेळी जर तिने वजन नीट नाही वाढवले तर तिला काढून टाकतील असेही म्हटले होते.

''नाहीतर तिला सीरिजमधून काढून टाकेन''

प्रकाश झा म्हणाले की, एका महिन्यानंतर अदिती आली आणि तिने मला म्हटलं की, तिचं ७५० ग्रॅम वजन वाढले आहे. मग मी तिला म्हणालो की, जर तिने तिचे नीट वजन वाढविले नाही तर तिला सीरिजमधून काढून टाकेन आणि ऑडिशन घेईन. हळूहळू तिने वजन वाढविले. ऑडिशनमध्ये मला तिच्याबद्दल जो स्पार्क दिसला होता. तो खरा ठरला आणि शूटिंग सुरू झाल्यानंतर तिने कमाल केली. तर बॉबी देओलही म्हणाला की, अदितीने वजन वाढवण्याचे काम खूप गांभीर्यामे केले. ती शूटिंगदरम्यान आमचे सगळं जेवण खात होती.

प्रकाश झा यांनी बॉबी देओलचंही केलं कौतुक
यावेळी प्रकाश झा यांनी बॉबी देओलचं खूप कौतुक केले. ते म्हणाले की, मी नेहमीच बॉबी देओलवर विश्वास ठेवला. तो एक चांगला अभिनेता आहे. या भूमिकेसाठी मला असा चेहरा हवा होता ज्याला सगळ्यांची पसंती मिळेल. त्यासाठी मी बॉबी देओलला बोलवलं. त्याला सलाम आहे. त्याने भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे.
 

Web Title: The director didn't want to cast Aditi Pohankar as Pammi Pehlwan in 'Aashram', but...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.