'The Family Man'च्या तिसऱ्या सीझनमध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, तोडीस तोड असेल कामगिरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 03:28 PM2024-10-17T15:28:13+5:302024-10-17T15:44:48+5:30

'The Family Man'च्या तिसऱ्या सीझनमध्ये दमदार अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

The Family Man 3 Update Nimrat Kaur Will Play Villain In Manoj Bajpayee Web Series | 'The Family Man'च्या तिसऱ्या सीझनमध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, तोडीस तोड असेल कामगिरी!

'The Family Man'च्या तिसऱ्या सीझनमध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, तोडीस तोड असेल कामगिरी!

'द फॅमिली मॅन'चा (The Family Man Season 3) या बहुचर्चित सीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांचीही उत्सुकता शिगेला पोहचली असल्याचं पाहायला मिळतंय. सीरिजच्या शुटिंगला सुरुवात झाल्याची चर्चा आहे. अशातच आता या सीरिजमध्ये आणखी एका दमदार अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ती कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत. 


'द फॅमिली मॅन'च्या तिसऱ्या सीझनमध्ये अभिनेता जयदीप अहलावत खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबतीला आता निर्मात्यांनी निम्रत कौरची निवड केली आहे. निम्रत कौरने 'लंच बॉक्स'मध्ये जबरदस्त अभिनय केला होता. तिने 'होमलँड' आणि 'वेवर्ड पाइन्स' या अमेरिकन मालिकांमध्येही काम केले आहे. ती अक्षय कुमारसोबतही झळकली आहे. आता तिला 'द फॅमिली मॅन'मध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 



 दरम्यान, सीरीजचे नागालँडमध्ये शूटिंग सुरू असून व्यक्तिरेखेबाबत अद्याप कोणतीही विशेष माहिती समोर आलेली नाही. 'द फॅमिली मॅन 3' मध्ये मनोज बाजपेयीची भूमिका श्रीकांत कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आपल्या पत्नीसोबतचे नाते सुधारण्याचा प्रयत्न करेल. काळानुसार आव्हाने वाढल्याचं दिसेल. ही सीरिज 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे आता हा सीझन कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.                                                         

Web Title: The Family Man 3 Update Nimrat Kaur Will Play Villain In Manoj Bajpayee Web Series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.