'स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी'चा अंतिम भाग या दिवशी येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 06:31 PM2023-10-21T18:31:50+5:302023-10-21T18:32:23+5:30

Scam 2003: The Telgi Story : पहिला भागाच्या यशानंतर, स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी त्याच्या अंतिम भागासह परत येणार आहे.

The final episode of 'Scam 2003: The Telgi Story' will be released on this day | 'स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी'चा अंतिम भाग या दिवशी येणार भेटीला

'स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी'चा अंतिम भाग या दिवशी येणार भेटीला

पहिला भागाच्या यशानंतर, स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी त्याच्या अंतिम भागासह परत येणार आहे. या सीरिजचे सर्व भाग ३ नोव्हेंबरपासून सोनी लिव्हवर प्रसारित होतील. हंसल मेहता यांची 'स्कॅम २००३ द तेलगी स्टोरी' ही सीरिज गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या सीरिजमध्ये भारतातील सर्वात मोठा तेलगी स्कॅम दाखवण्यात आला आहे. 

'स्कॅम २००३ द तेलगी स्टोरी व्हॉल्युम २'मध्ये सीरिजमध्ये कर्नाटकातील खानापूर येथे जन्मलेल्या अब्दुल करीम तेलगी या फळविक्रेत्याचे जीवन आणि १८ राज्यांमध्ये पसरलेल्या आणि संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या भारतातील सर्वात कल्पक घोटाळ्यांपैकी एकाचा मास्टरमाइंड बनण्याचा त्याचा प्रवास दाखवला आहे. स्कॅम २००३: द तेलगी स्टोरीची निर्मिती अप्लॉज एंटरटेनमेंटने स्टुडिओनेक्स्टच्या सहकार्याने केली आहे.

'स्कॅम २००३ द तेलगी स्टोरी व्हॉल्युम २'मध्ये आता मोठ्या हालचाली पाहायला मिळणार आहेत. तेलगीसोबत या घोटाळ्यात कोणते राजकीय नेते सहभागी झाले होते? याबाबत माहिती समोर येणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. सीरिजच्या आगामी भागात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहेत.


या मालिकेत गगन देव रियार, सना अमीन शेख, भावना बलसावेर, भरत जाधव, जे.डी. चक्रवर्ती, भरत दाभोळकर, शशांक केतकर, तलत अजीज, निखिल रत्नपारखी, विवेक मिश्रा, हिता चंद्रशेखर, अजय जाधव, दिनेश लाल यादव यांच्या भूमिका आहेत. ही मालिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक हंसल मेहता या सीरिजचे शो रनर असून तुषार हिरानंदानी यांनी ती दिग्दर्शित केली आहे. 

Web Title: The final episode of 'Scam 2003: The Telgi Story' will be released on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.