'रानबाजार'च्या शेवटच्या भागामुळे खळबळ माजणार; 'या' दिवशी अखेरचे दोन भाग होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 05:46 PM2022-06-09T17:46:07+5:302022-06-09T17:47:01+5:30

RaanBaazaar: 'रानबाजार' 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर झळकल्यानंतर त्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला.

The last part of RaanBaazaar The last two episodes will be screened on this day | 'रानबाजार'च्या शेवटच्या भागामुळे खळबळ माजणार; 'या' दिवशी अखेरचे दोन भाग होणार प्रदर्शित

'रानबाजार'च्या शेवटच्या भागामुळे खळबळ माजणार; 'या' दिवशी अखेरचे दोन भाग होणार प्रदर्शित

googlenewsNext

अभिजित पानसे दिग्दर्शित 'रानबाजार'ची (RaanBaazaar)  घोषणा झाल्यापासून ही सीरिज सातत्याने चर्चेत येत आहे. पहिल्यादाच मराठीत इतक्या बोल्ड कंटेटच्या सीरिजची निर्मिती झाली असून तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी या दोघींनींही जबरदस्त बोल्ड सीन दिले आहेत. त्यामुळे ही सीरिज सातत्याने चर्चेत येत आहे. आतापर्यंत या सीरिजचे अनेक भाग प्रदर्शित झाले असून अखरेचे २ भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे अखरेच्या भागात या सीरिजमध्ये काय होतं हे जाणून घेण्याची उत्सुकता नेटकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

पॉलिटिकल थ्रिलर असणाऱ्या या भव्य वेबसीरिजची 'असंच काहीसं घडलं होतं... कदाचित ?!' अशी टॅगलाइन या सीरिजची आहे. विशेष म्हणजे ही टॅगलाइन बरंच काही सांगून जाणारी आहे. त्यामुळे 'रानबाजार'च्या प्रदर्शनाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. 'रानबाजार' 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर झळकल्यानंतर त्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. वेबविश्वात वादळ आणणाऱ्या या वेबसीरिजचे प्रत्येक आठवड्याला दोन -तीन भाग प्रदर्शित झाल्यानंतर आता शेवटचे आणि अत्यंत खळबळजनक असे दोन भाग १० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आतापर्यंत प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे या दोन भागांमध्ये दडलेली आहेत. 

आजवरची भारतातील ही सर्वोत्तम सीरिज असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. 'रानबाजार'च्या प्रत्येक भागाचा शेवट हा एका अशा वळणावर येऊन थांबलाय, जो आपल्याला पुढील भाग पाहण्यास प्रवृत्त करणारा आहे. प्रत्येक क्षणी आपली उत्कंठा वाढवणारी ही वेबसीरिज आहे. पहिल्याच भागात राजकारणातील एका मोठ्या व्यक्तीची हत्या झाल्याचे दिसत आहे. ही हत्या कोणी केली? हा हनी ट्रॅप आहे की, या मृत्यूमागे आणखी काही कारण आहे? या हत्येमागे आणखी कोणी सूत्रधार आहे? रत्ना (प्राजक्ता माळी) आयेशाला का आसरा देते? चारुदत्त मोकाशी (अभिजित पानसे) या सर्व प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यात यशस्वी होणार का? मुख्यमंत्रीपदी कोण येणार? सत्तापालट होणार का ? या आणि अशा अनेक प्रश्नांचा उलगडा पुढील दोन भागांत होणार आहे. 

मुख्यमंत्री सतीश नाईक ( मोहन आगाशे), सयाजी पाटील ( मोहन जोशी), पत्रकार दिवेकर ऊर्फ आप्प्पा (मकरंद अनासपुरे), निशा (उर्मिला कोठारे), युसूफ पटेल (सचिन खेडेकर), इन्स्पेक्टर पालांडे (वैभव मांगले), रावसाहेब यादव ( अनंत जोग) , प्रेरणा सयाजीराव पाटील ( माधुरी पवार) या सर्वांनीच आपापल्या भूमिका अगदी चोख पार पाडल्या आहेत. 

Web Title: The last part of RaanBaazaar The last two episodes will be screened on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.