‘द  रेलवे मेन' ने जिंकले ६ Filmfare OTT Awards! दिग्दर्शक शिव रवैल म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 04:25 PM2024-12-02T16:25:56+5:302024-12-02T16:26:58+5:30

'द रेलवे मेन' या भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित आणि त्या वेळच्या धाडसी रेल्वे कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या सीरिजने Filmfare OTT Awards मध्ये सहा महत्त्वाचे पुरस्कार जिंकले आहेत.

The Railway Men wins 6 filmfare ott awards director shiv rawail thanks audience | ‘द  रेलवे मेन' ने जिंकले ६ Filmfare OTT Awards! दिग्दर्शक शिव रवैल म्हणाले...

‘द  रेलवे मेन' ने जिंकले ६ Filmfare OTT Awards! दिग्दर्शक शिव रवैल म्हणाले...

नेटफ्लिक्स आणि वायआरएफ एंटरटेनमेंटच्या द रेलवे मेन या भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित आणि त्या वेळच्या धाडसी रेल्वे कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या The Railway Men सीरिजने Filmfare OTT Awards मध्ये सहा महत्त्वाचे पुरस्कार जिंकले आहेत. शिव रवैल (Shiv Rawail) यांनी दिग्दर्शित केलेला हा शो प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्या हृदयाला भिडणारा ठरला असून, जागतिक स्तरावर यशस्वी ठरला आहे.  

शिव रवैल, ज्यांनी या प्रोजेक्टचे नेतृत्व वायआरएफ एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली केले, त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या "माझ्या डेब्यू प्रोजेक्ट द रेलवे मेन ला मिळालेलं हे प्रेम आणि कौतुक पाहून मी भारावून गेलो आहे! जेव्हा आम्ही हा प्रोजेक्ट सुरू केला, तेव्हा आम्हाला माहित होतं की हा एक असा किस्सा सांगायचा आहे जो लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. भोपाळमधील या अदृश्य हिरोंच्या बलिदानाला आम्ही सलाम केला आहे, जे दुसऱ्यांच्या जीव वाचवण्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावून उभे राहिले. आपल्या देशात अशा अनगिनत धाडसाने भरलेल्या कथा आहेत, ज्या प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचायला हव्यात. वायआरएफच्या माध्यमातून आम्हाला या हिरोंच्या कथा लोकांपर्यंत पोहोचवता आल्या याचा अभिमान आहे. "

आमचे पार्टनर नेटफ्लिक्स इंडियाचे आभार, ज्यांनी या प्रोजेक्टला भारतात आणि जागतिक स्तरावर मोठं यश मिळवून दिलं. आम्ही खूप आनंदित आहोत की आमच्या प्रोजेक्टने लोकांच्या हृदयाला स्पर्श केला आणि Filmfare आणि ज्युरी मेंबर्सचे आभार, ज्यांनी आमच्या कामाला ओळख दिली आणि आम्हाला काल रात्री इतके पुरस्कार देऊन सन्मानित केलं."

वायआरएफ एंटरटेनमेंटसाठी अभिमानाचा क्षण

'द रेलवे मेन' ही सीरिज वायआरएफच्या डिजिटल पदार्पणाचं प्रतीक ठरली असून, सामान्य लोकांच्या असामान्य धाडसाला उजाळा देणारी कथा जगभरात पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.

Web Title: The Railway Men wins 6 filmfare ott awards director shiv rawail thanks audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.