'पंचायत ४'च्या शूटिंगला सुरूवात, फुलेरा गावातील प्रधान जी आणि सचिव जीचा फोटो झाला लीक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 10:05 AM2024-10-30T10:05:31+5:302024-10-30T10:06:24+5:30

Panchayat 4 : लोकप्रिय वेबसीरिजपैकी एक सीरिज म्हणजे पंचायत. या सीरिजच्या तीन भागांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता चौथा सीझन भेटीला येणार आहे.

The shooting of 'Panchayat 4' has started, the photo of Pradhan ji and Secretary ji of Phulera village has been leaked | 'पंचायत ४'च्या शूटिंगला सुरूवात, फुलेरा गावातील प्रधान जी आणि सचिव जीचा फोटो झाला लीक

'पंचायत ४'च्या शूटिंगला सुरूवात, फुलेरा गावातील प्रधान जी आणि सचिव जीचा फोटो झाला लीक

लोकप्रिय वेबसीरिजपैकी एक सीरिज म्हणजे पंचायत. या सीरिजच्या तीन भागांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता चौथा सीझन भेटीला येणार आहे. प्राइम व्हिडिओने नुकतेच जाहीर केले की त्यांच्या बहुप्रतिक्षित मूळ मालिका पंचायतच्या चौथ्या सीझनचे शूटिंग सुरू झाले आहे. तसेच सेटवरील एक फोटोदेखील शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेता जितेंद्र कुमार, चंदन रॉय आणि फैजल मलिक पंचायतचा पुढील रोमांचक अध्याय सुरू करताना दिसत आहेत. 

पंचायत सीझन ४ची निर्मिती द व्हायरल फीव्हर (TVF) द्वारे केली आहे, जे दीपक कुमार मिश्रा यांनी क्रिएट केली आहे. चंदन कुमार लिखित आणि दीपक कुमार मिश्रा आणि अक्षत विजयवर्गीय यांनी दिग्दर्शित केली आहे. या मालिकेत प्रिय सचिव जी म्हणून जितेंद्र कुमार मुख्य भूमिकेत आहेत, तसेच रघुबीर यादव, नीना गुप्ता, सान्विका, चंदन रॉय, फैसल मलिक, दुर्गेश कुमार, सुनीता राजवार आणि पंकज झा हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. यासोबत पंचायतमध्ये आणखी काही नवीन पात्रे देखील पाहायला मिळणार आहे.


नव्या सीझनकडून चाहत्यांना आहेत अपेक्षा 
पंचायत सीझन ४मध्ये हृदयस्पर्शी विनोद, गोड क्षण आणि एक अनोखा ड्रामा असेल ज्याचा रसिक खूप आनंद घेतील. या बहुप्रतिक्षित मालिकेतील प्रत्येक भागाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. आता या सीझनकडूनही प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत.

Web Title: The shooting of 'Panchayat 4' has started, the photo of Pradhan ji and Secretary ji of Phulera village has been leaked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.