सस्पेन्सचा थरार, ॲक्शनचा धमाका... Netflix वर 'या' वेबसीरिजचा बोलबाला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 15:49 IST2024-12-18T15:49:17+5:302024-12-18T15:49:38+5:30
सध्या Netflix वर पाच वेबसीरिजचा बोलबाला पाहायला मिळतोय.

सस्पेन्सचा थरार, ॲक्शनचा धमाका... Netflix वर 'या' वेबसीरिजचा बोलबाला!
ओटीटी (OTT) विश्वात विविध धाटणीच्या, वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या वेब सीरिज (Web Series) प्रदर्शित होत आहेत. ॲक्शनपासून सस्पेन्स आणि थ्रिलरपासून रोमान्सपर्यंत सर्व काही. चित्रपट पाहण्यापेक्षा वेबसीरिज पाहणारा मोठा वर्ग आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अनेक वेबसीरिजने सोशल मीडियावरदेखील चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सध्या Netflix वर पाच सीरिजचा बोलबाला पाहायला मिळतोय.
दर आठवड्याप्रमाणे यावेळी देखील OTT प्लॅटफॉर्म Netflix वर टॉप ट्रेडिंग वेब वेबसीरिजची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार जर तुम्हाला स्पाय थ्रिलर पाहण्याचा शौक असेल तर नेटफ्लिक्सच्या ब्लॅक डोव्हज (Black Doves) या वेबसिरीजची सध्या खूप चर्चा होत आहे.
कोरियन सीरिज पाहण्याची क्रेझ प्रेक्षकांमध्ये झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे. दक्षिण कोरियाच्या रोमँटिक थ्रिलर मालिकेचे नाव 'व्हेन द फोन रिंग्स' (When The Phone Rings) ही सीरिज या यादीत चौथ्या स्थानावर आहे.
प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 2' (The Great Indian Kapil Show)चे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर सर्व्हायव्हल थ्रिलर 'ला पाल्मा' (La Palma) चर्चेत आहे. रोहित सराफ आणि प्राजक्ता कोहली स्टारर कॉलेज रोमँटिक ड्रामा मालिका 'मिसमॅच्ड'चा तिसरा सीझन (Mismatched 3)ट्रेडिंगमध्ये आहे. ही सीरिज या आठवड्यात Netflix वर 1 स्थानावर आहे.