वहीदा बेगमने 'हीरामंडी'च्या सीक्वलवर सोडलं मौन, संजीदा शेख म्हणाली - "आम्ही शूटिंग..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 17:24 IST2024-12-17T17:23:59+5:302024-12-17T17:24:48+5:30
संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची 'हीरामंडी' (Heeramandi Webseries) ही पीरियड ड्रामा मालिका सुपरहिट ठरली होती. ती नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिली जाणारी वेब सीरिज बनली आहे

वहीदा बेगमने 'हीरामंडी'च्या सीक्वलवर सोडलं मौन, संजीदा शेख म्हणाली - "आम्ही शूटिंग..."
संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची 'हीरामंडी' (Heeramandi Webseries) ही पीरियड ड्रामा मालिका सुपरहिट ठरली होती. ती नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिली जाणारी वेब सीरिज बनली आहे. यामध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, शर्मीन सहगल, फरदीन खान या कलाकारांनी आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. संजीदा शेख (Sanjeeda Shaikh) हिच्या अभिनयाची भरभरून प्रशंसा झाली. तिने वहिदाची भूमिका साकारली होती. आता अभिनेत्रीने हीरामंडी सीझन २ चे अपडेट शेअर केले आहे.
'हीरामंडी' फेम संजीदा शेख हिने सीक्वलबद्दलची तिची उत्सुकता शेअर केली. न्यूज १८ शी बोलताना ती म्हणाली की, ''मला खात्री आहे की हीरामंडी २ मोठा आणि चांगला असेल. मला माहित नाही की आम्ही शूटिंग कधी सुरू करू, पण जेव्हा संजय लीला भन्साळी सरांची गोष्ट येते तेव्हा ते एखाद्या ड्रीम प्रोजेक्टसारखे असते.''
'हीरामंडी'नंतर अभिनेत्रीला आला हा अनुभव
संजय लीला भन्साळींची हीरामंडी केल्यानंतर तिच्या प्रवासाविषयी बोलताना संजीदा म्हणाली, ''मी असे काही शो पाहायचे जिथे काही कलाकार येतात आणि ते म्हणायचे की त्यांना 'भंसालीफाईड' केले आहे आणि मला आश्चर्य वाटायचे की माझी पाळी कधी येईल? आता मी जेव्हा मीटिंगला जाते तेव्हा निर्माते मी किती चांगली कलाकार आहे याची प्रशंसा करतात. मला खूप छान वाटतं. कारण माझे मत आहे की माझे काम स्वतःच बोलले पाहिजे.''
काय असेल 'हीरामंडी २'ची कथा?
Netflix ने जून २०२४ मध्ये लोकप्रिय वेब सिरीज 'हीरामंडी' सीझन २ ची घोषणा केली होती. दिग्दर्शकाने व्हरायटीशी संवाद साधताना मालिकेच्या दुसऱ्या सीझनची कथा सांगितली होती. ते म्हणाले, ''हीरामंडी २ मध्ये, महिला आता लाहोरमधून फिल्म इंडस्ट्रीत येतात. फाळणीनंतर त्यांनी लाहोर सोडले आणि बहुतेक मुंबई किंवा कोलकाता चित्रपट उद्योगात स्थायिक झाले. हा बाजार प्रवास कसा सुरू होईल? यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.''