वाशिम : दोन वाहनांची समोरासमोर धडक; तीन जण जखमी
By संतोष वानखडे | Published: September 4, 2022 06:01 PM2022-09-04T18:01:29+5:302022-09-04T18:06:34+5:30
तांदळी शेवइ फाट्यानजीकच्या वळणावर या दोन्ही वाहनाची समोरासमोर धडक बसली.
कोंडाळा महाली (वाशिम)- दोन छोट्या मालवाहतूक वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने तीन जण जखमी झाल्याची घटना तांदळी शेवई फाट्यानजिकच्या घडली. ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
एक वाहन वाशिमवरून शेलूबाजारकडे तर दुसरे वाहन शेलूबाजारकडून वाशिमकडे जात होते. तांदळी शेवइ फाट्यानजीकच्या वळणावर या दोन्ही वाहनाची समोरासमोर धडक बसली. या अपघातात एक महिला व दोन चालक गंभीर जखमी झाले. जखमींना पार्डीटकमोर येथील रुग्णवाहिकेने वाशीम येथे उपचारार्थ खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले. दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. जखमी वाघागड येथील असल्याचे समजते. वृत लिहीपर्यंत जखमींची नावे समजू शकली नाही.
माहितीदर्शक फलक लावावा
तांदळी शेवइ फाट्यानजीकचे वळण धोकादायक असून दोन वर्षांपूर्वी याच वळणावर कारचा अपघात होऊन एका पोलीसाला आपला जीव गमवावा लागला. सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी धोकादायक वळण असल्याचे फलक तसेच गतिरोधक बसविण्याची मागणी तांदळीशेवई येथील ग्रामस्थ व प्रवाशांमधून होत आहे.