'मानवत मर्डर्स'चा ट्रेलर रिलीज! सई ताम्हणकर, आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरेंची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 04:35 PM2024-09-04T16:35:22+5:302024-09-04T16:35:59+5:30

संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणाऱ्या मानवत मर्डर्स घटनेवर मराठी वेबसीरिज येत आहे (manvat murders)

webseries based on manvat murders on maharashtra starring sai tamhankar sonali kulkarni ashutosh govarikar makrand anaspure | 'मानवत मर्डर्स'चा ट्रेलर रिलीज! सई ताम्हणकर, आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरेंची भूमिका

'मानवत मर्डर्स'चा ट्रेलर रिलीज! सई ताम्हणकर, आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरेंची भूमिका

महाराष्ट्राला अनेक घटनांनी हादरवून सोडलं आहे. या घटना आठवल्या तरीही आजही अनेकांच्या काळजाचा ठोका सुचतो. महाराष्ट्राला हादरवणारी अशीच एक मोठी घटना म्हणजे 'मानवत हत्याकांड'. याच घटनेवर आधारीत मराठी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सई ताम्हणकर(sai tamhankar), मकरंद अनासपुरे (makrand anaspure) आशुतोष गोवारीकर. सोनाली कुलकर्णी (sonali kulkarni) अशा दिग्गज कलाकारांची या वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिका आहे. 'आत्मपॅफ्लेट' या लोकप्रिय सिनेमाचे दिग्दर्शक आशिष बेंडे या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.

'मानवत मर्डर्स' वेबसीरिजचा ट्रेलर

सोनी लिव्‍हवर रोमांचक क्राइम थ्रिलर सिरीज 'मानवत मर्डर्स'चा ट्रेलर काल रिलीज झालाय. ही सिरीज सर्वात भयानक ऐतिहासिक घटनेचा उलगडा करते, जिने १९७२ ते १९७४ पर्यंत देशाला हादरून टाकले.  आशिष बेंडे यांचे दिग्‍दर्शन असलेल्‍या आगामी सिरीजमध्‍ये या भयावह घटनेचा उलगडा होणार आहे. भारताचे शेरलॉक होम्‍स म्‍हणून ओळखले जाणारे सीआयडीमधील प्रतिष्ठित डिटेक्टिव्‍ह ऑफिसर रमाकांत एस. कुलकर्णी यांच्‍या नेतृत्‍वांतर्गत तपास पथक या खटल्‍याची तपासणी करताना पाहायला मिळेल.  १९७०च्‍या दशकात ग्रामीण महाराष्‍ट्रातील गूढ हत्‍यांची मालिका कशी सोडवली गेली, हे या वेबसीरिजमधून पाहायला मिळेल. 


काय होती मानवत मर्डर्स ही घटना?

महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील मानवत या गावात ही मोठी घटना घडली. ज्यामुळे संपूर्ण देश हादरला. १९७२ ते १९७४ या कालावधीत गावातील बायका, मुली गायब होऊ लागल्या. एकूण सहा जणींचे मृतदेह गावात आढळले. या मुलींचे मृतदेह शेतात, विहिरीत अथवा नदीवर सापडले जायचे. मृतदेहांची विटंबना केलेली दिसायची. मुली आणि महिलांना मारण्याचा पॅटर्न सारखा होता.

या तारखेला रिलीज होणार वेबसीरिज

पुढे ठराविक कालावधीमध्ये आणखीही मृतदेह आढळून आले. पोलिसांना यामागचा सूत्रधार सापडत नव्हता. पुढे एका प्रत्यक्षदर्शीने त्याच्या डोळ्यांसमोर दोन महिलांचा खून बघितला. मग हे खून कोण आणि का करत होतं? याचा उलगडा झाला. यामागे टोकाची अंधश्रद्धा, मुंज्या आणि जादूटोण्याचा बिभत्स प्रकार उघडकीस आला. ही घटना कशी घडली याचा सविस्तर खुलासा 'मानवत मर्डर्स' या वेबसीरिजमधून प्रेक्षकांना बघायला मिळेल. आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्‍हणकर असे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. ४ ऑक्‍टोबरपासून  'मानवत मर्डर्स' सोनी लिव्‍हवर बघता येईल.

Web Title: webseries based on manvat murders on maharashtra starring sai tamhankar sonali kulkarni ashutosh govarikar makrand anaspure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.