वेबसिरीज

By Admin | Published: March 10, 2017 01:15 PM2017-03-10T13:15:28+5:302017-03-10T13:15:28+5:30

स्मार्टफोनला टच करत बोटावर टुकटुकत आलेल्या मनोरंजनाचा पर्सनल टर्न

WebSeries | वेबसिरीज

वेबसिरीज

googlenewsNext
- शचि मराठे
 
 
घरचा रिमोट कायम आई किंवा आजीच्या हातात. त्यांच्या रतिब्या सिरीअल्स पाहत राहणं आणि तेच ते सासबहू टिपिकल दळण दळणं अशक्य आहेच. पण पर्याय काय? वेबसिरीज. मनोरंजन पर्सनल करणारी एक तरुण दुनिया. पण नक्की चालतं काय त्या दुनियेत?
 
हातात असलेले स्मार्ट फोन्स.
घर, कॅफे, हॉटेल्स, कॉलेज इथं सर्वत्र बहुतांश फुकट असलेलं वायफाय. आणि त्यातून उपलब्ध होणारं नवंकोरं मनोरंजन. आणि त्याचं माध्यम यू ट्यूब!
हे सारं असताना तरुण जगानं नव्या मनोरंजनाचा थेट हायवे धरला नसता तरच नवल!
त्यातूनच जन्माला आलं वेबसिरीज नावाचं नवं जग!
या जगात काय नाही? मुळात हे जग इतकं व्हर्च्युअल आहे की जगात कुठंही बसून तुम्ही जगभरातली कुठलीही वेबसिरीज पाहूच शकता. तेही एकेकट्यानं. आपापल्या सोयीनं, आपल्या वेळेत..
आपल्या आवडीचं!
कौटुंबिक मनोरंजनाची चौकट तोडमोड करत आता पर्सनल व्हायला सुरुवात झाली आहेच, त्या पर्सनल होण्यात या वेबसिरीजनं आणखी एक नवा आयाम दिला आहे.
होतं काय, घरचा रिमोट कायम आई किंवा आजीच्या हातात. त्यांच्या रतिब्या सिरीअल्स पाहत राहणं आणि तेच ते सासबहू टिपिकल दळण दळणं आता अशक्य होतंच. पण पर्याय काय?
तर काहीच नाही. आहे ते पहा..
पण मग ते पहायचं टाळणाऱ्या तरुणांची बोटं आता इंटरनेटकडे म्हणजेच यू ट्यूबकडे वळू लागली आहेत. तिथलं एण्टरटेनिंग ऐवज ती बोटं शोधू लागली आहेत.
आणि त्या शोधात त्यांना सापडलाय एक अलाउद्दीनचा जीन. हव्या त्या विषयावरचा हवा तो व्हिडीओ पुरवणारा एक यू ट्यूबचा जीन. आणि त्या जीनकडे आहे वेबसिरीज नावाच्या मालिकांचं एक जग!
त्या जगाला अमुक वेळेत मालिका बघा असं बंधन नाही. अमुक एका जागी बसून, घरातच थांबून मालिका बघायची गरज नाही. इन्फॅक्ट कशाचीच गरज नाही. जगातला कोणताही देश, कोणतीही भाषा, कोणताही विषय, त्यावरची मालिका आणि मनोरंजन कुठंही बसून पाहता येऊ शकतं.
बस, आॅफिस, कॉलेज अगदी टॉयलेट सीटवरही बसून या मालिका बघण्याची ही लक्झरी आहे. मराळमोळ्या मिथिला पारकरचं कप साँग असो किंवा इंग्लंडचे स्लो मो गाईज असोत, या दोघांच्याही क्रिएटिव्हिटी आणि टॅलण्टला यू ट्यूबचा प्लॅटफॉर्म मिळाला आणि हे दोघं स्टार झाले. 
‘हवा तो विषय हव्या त्या पद्धतीनं मांडण्याची मुभा’ ही या वेबसिरीजच्या जगातली नवी संधी आहे. आणि समोर आहे सर्व वयोगटातील पसरलेलं जगभरातला आॅर्डिअन्स आणि एक मोठं मार्केट!
त्यातून वेबसिरीज नावाचं एक मोठं जग जगभरातच निर्माण झालं आहे..
त्या जगात नेमकं चाललंय काय आणि आपला मनोरंजनाचाच नाही तर ते अनुभवण्याचा फीलही कसा बदलतो आहे..
याची एक रंजक सफर..
थेट वेबसिरीजच्या जगातून..
 

 

Web Title: WebSeries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.