WHAT ! लग्नाच्या काहीच दिवसांनंतर शिबानी दांडेकरने इंस्टाग्रामवरून हटवले 'मिसेस अख्तर'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 06:17 PM2022-03-03T18:17:48+5:302022-03-03T18:18:24+5:30

फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर(Shibani Dandekar)ने १९ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर सतत शिबानी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येते आहे.

WHAT! A few days after the wedding, Shibani Dandekar deleted 'Mrs. Akhtar' from Instagram. | WHAT ! लग्नाच्या काहीच दिवसांनंतर शिबानी दांडेकरने इंस्टाग्रामवरून हटवले 'मिसेस अख्तर'

WHAT ! लग्नाच्या काहीच दिवसांनंतर शिबानी दांडेकरने इंस्टाग्रामवरून हटवले 'मिसेस अख्तर'

googlenewsNext

शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर १९ फेब्रुवारीला लग्नाच्या बंधनात अडकले. शिबानी दांडेकरने लग्नानंतर लगेचच इन्स्टाग्रामवर तिचे नाव बदलून 'मिसेस अख्तर' केले. यानंतर ती देखील चर्चेत आली होती, मात्र आता शिबानी दांडेकरने पुन्हा तिचे नाव इन्स्टाग्राम बायोमधून हटवले आहे.

शिबानी दांडेकरने इंस्टाग्रामवर बायोमधून मिसेस अख्तर हटवले आहे पण तिने फरहान अख्तरचे आडनाव ठेवले आहे. तसेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे डिस्प्ले फोटो बदलले आहे. लग्नानंतर तिने इन्स्टाग्रामवर तिचे नाव बदलून शिबानी दांडेकर-अख्तर असे ठेवले आहे. लग्नानंतर तिने तिचा बायो बदलून 'निर्माती, प्रस्तुतकर्ती, अभिनेत्री, गायिका आणि मिसेस अख्तर' असा बदल केला होता त्यानंतर आता तिने 'निर्माती, सादरकर्ती, अभिनेत्री, गायिका' असे केले आहे.

नुकतेच शिबानी दांडेकरने तिची सासू शबाना आझमी यांच्या आगामी 'हॅलो' या सीरिजचा टीझरही शेअर केला. टीझर शेअर करत तिने लिहिले की, 'हे विलक्षण आहे. @halotheseries मध्ये @azmishabana8 पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. २४ मार्चसाठी अतिशय उत्साही आणि खूप अभिमान.'

तत्पूर्वी शबाना आझमी यांनी शिबानी दांडेकरचे त्यांच्या कुटुंबात स्वागत केले. फॅमिली फोटो शेअर करत शबाना आझमीने लिहिले, 'हॅपी फॅमिली लवली शिबानीचे फॅमिलीमध्ये स्वागत करते.' यासोबतच त्यांनी खूप हार्ट इमोजीही टाकले आहेत.
 

Web Title: WHAT! A few days after the wedding, Shibani Dandekar deleted 'Mrs. Akhtar' from Instagram.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.