‘पिंक’नंतर काय करतेय किर्ती?

By Admin | Published: October 20, 2016 02:32 AM2016-10-20T02:32:53+5:302016-10-20T02:32:53+5:30

‘पिंक’ चित्रपटातील ‘फलक’ आठवते आहे. होय, अर्थात किर्ती कुलहारी.

What are you doing after 'Pink'? | ‘पिंक’नंतर काय करतेय किर्ती?

‘पिंक’नंतर काय करतेय किर्ती?

googlenewsNext


‘पिंक’ चित्रपटातील ‘फलक’ आठवते आहे. होय, अर्थात किर्ती कुलहारी. पण ‘पिंक’ नंतर किर्ती काय करते? हे जाणून घेण्यास तुम्हीही उत्सूक असाल. तर किर्ती सध्या एका नामवंत दिग्दर्शकाच्या प्रोजेक्टमध्ये बिझी झाली आहे. हा दिग्दर्शक म्हणजे मधूर भांडारकर. मधूरच्या ‘इंदू सरकार’ या चित्रपटात किर्ती दिसणार आहे. ‘पिंक’मधील किर्तीचा अभिनय पाहून मधूर चांगलाच प्रभावित झाला. इतका की, ‘इंदू सरकार’साठी त्याने किर्तीला साईन केले. ‘इंदू सरकार’ हा इंदिरा गांधींच्या काळातील आणीबाणीच्या कालखंडातील घटनाक्रमाची पार्श्वभूमी असलेला सिनेमा आहे. चित्रपटाचे नाव ‘इंदू सरकार’ असले तरी इंदिरा गांधींशी त्याचा संबंध नाही. येत्या नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाचे शूंिटंग सुरु होणार आहे. दिल्ली आणि पुणे येथे हे शूंिटंग होईल.

Web Title: What are you doing after 'Pink'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.