असं काय घडलं की संजूबाबाची लेक त्रिशाला दत्तला ७ वर्षांचे रिलेशनशीप लागलं तोडावं, तिनेच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 01:08 PM2021-04-26T13:08:37+5:302021-04-26T13:09:04+5:30
त्रिशलाने नुकतेच तिच्या चाहत्यांशी इन्स्टाग्राम स्टोरीवरुन संवाद साधला. त्यावेळी तिने तिच्या खासगी आयुष्याचा खुलासा केला.
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची लेक त्रिशाला दत्त सध्या सोशल मीडियावर अॅक्टिव आहे. ती फिजिओथेरपिस्ट असून सोशल मीडियावर बर्याच समस्यांविषयी ती जागरूकता निर्माण करते. त्रिशलाने नुकतेच तिच्या चाहत्यांशी इन्स्टाग्राम स्टोरीवरुन संवाद साधला. ज्यामध्ये तिने सांगितले की जर तुम्हाला कुणी रिलेशनशिपमध्ये फसवलं असेल तर त्यातून बाहेर कसे पडायचे. त्रिशलानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
त्रिशला दत्तला एका चाहत्याने विचारले की, तुला प्रेमात फसवले गेले आहे का? यावर तिने उत्तर दिले - हो. त्यावेळी, दुसर्या चाहत्याने विचारले की तिचे सर्वात मोठे रिलेशन किती दिवस टिकले? आणि ब्रेकअप का झाले? त्यावर त्रिशाला म्हणाली की, तिचे सर्वात मोठे नाते सात वर्षे टिकले. हे नाते का मोडले यावर उत्तर देताना त्रिशाला म्हणाली की आम्ही दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. त्याला आमचे नाते पुढे आणायचे होते पण त्यावेळी मी तयार नव्हते आणि त्या वर्षांत आमच्यात खूप फरक पडला. थोडक्यात म्हटले तर आम्ही दोघेही वेगळे झालो होतो. असे घडत असते, असे घडू शकते. आज तो विवाहित आहे आणि त्याला मुले आहेत. मी त्याला शुभेच्छा देते.
काही काळापूर्वी त्रिशाला टॉक्सिक नात्याबद्दल बोलली होती. तिने सांगितले होते, तिच्या प्रियकराने हळूहळू तिला आपल्या मित्रांपासून वेगळे केले आणि त्रिशाला याचीही कल्पना नव्हती. त्रिशाला जेव्हा जेव्हा घराबाहेर पडायची किंवा परत यायची तेव्हा ती तिच्या प्रियकराला मॅसेज करुन सांगत होती. मात्र त्या मॅसेजला तिचा प्रियकर विचित्र पद्धतीने उत्तर द्यायचा. ते वाचल्यानंतर तिला वाटले की ती जे करत आहे ते करायला नको.
ती आता या नात्यातून बाहेर आली आहे. स्वत:ला एकनिष्ठ असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्रिशालाने स्वत:ला सोशल मीडियापासून दूर केले होते. टॉक्सिक नात्यातून बाहेर पडल्याने ती बरेच काही शिकली आहे, ज्यामुळे ती एक चांगली व्यक्ती बनल्याचेही तिने सांगितले.