शूटिंगनंतर कलाकारांच्या कपड्यांचं काय केलं जातं?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 12:38 PM2018-06-14T12:38:21+5:302018-06-14T12:39:47+5:30
सिनेमाचं काम पूर्ण झाल्यानंतर या कपड्यांचं काय होतं? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
मुंबई : बॉलिवूड सिनेमांमध्ये प्रेक्षक कलाकारांचे चमचमीत, डिझायनर कपडे पाहून चकीत होत असतात. या कपड्यांचा ट्रेंडही बाजारात बघायला मिळतो. कित्येक सिनेमांसाठी महागडे ड्रेस तयार केले जातात. पण सिनेमाचं काम पूर्ण झाल्यानंतर या कपड्यांचं काय होतं? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
काय होतं कलाकारांच्या कपड्यांचं?
1) कलाकारांचे हे कपडे फेकले जात नाहीत. हे कपडे प्रॉडक्शन हाऊसकडून वेगवेगळ्या बॉक्समध्ये सुरक्षित ठेवले जातात. या बॉक्सवर लेबल लावले जातात जेणेकरुन हे कपडे कोणत्या सिनेमातील आहे हे माहिती व्हावं.
2) काही प्रॉडक्शन हाऊस या कपड्यांचा वापर त्यांच्या दुसऱ्या सिनेमांसाठीही करतात. दुसऱ्या सिनेमांमध्ये मुख्य कलाकारांचे हे कपडे ज्युनिअर कलाकारांना दिले जातात.
3) जे सिनेमे कलाकारांच्या खूप जवळचे असतात. जे सिनेमे फार जास्त गाजलेले असतात त्या सिनेमाचे कलाकार त्यांचे खास कपडे आपल्याकडे ठेवून घेतात.
4) एखाद्या सिनेमासाठी जर डिझायनरने एखादा खास ड्रेस तयार केला तर तो ड्रेस सिनेमानंतर ते परत घेतात. उदाहरण द्यायचं तर बॉम्बे वेलवेट सिनेमात अनुष्का शर्माने परिधान केलेला ड्रेस हा 35 किलो वजनाचा होता. हा ड्रेस निहारिका खान या डिझायनरने तयार केला होता. तिने तो नंतर परत घेतला.