हा वाद आमिषाला इतका भोवला की, ना तिच्याकडे पैसा राहिला, ना कुटुंबाची साथ मिळाली, प्रेमानेही पाठ फिरवली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 06:49 PM2021-05-22T18:49:26+5:302021-05-22T18:53:35+5:30

करिअरच्या शिखरावर असताना अचानक आमिषाचा एक वाद समोर आला. आई-वडिलांवरच गंभीर आरोप आमिषाने केले.

When Ameesha Patel Had Sent A Legal Notice To Her Father For Mismanaging Her Accounts | हा वाद आमिषाला इतका भोवला की, ना तिच्याकडे पैसा राहिला, ना कुटुंबाची साथ मिळाली, प्रेमानेही पाठ फिरवली

हा वाद आमिषाला इतका भोवला की, ना तिच्याकडे पैसा राहिला, ना कुटुंबाची साथ मिळाली, प्रेमानेही पाठ फिरवली

googlenewsNext

कोणत्याही कलाकाराला काम मिळवणं, त्या मिळालेल्या संधीचे सोनं करणं आणि यश प्राप्त करणं ही काही सोपी बाब नाही. जे कलाकार हे करू शकतात ते अगदी सुपरस्टारपद मिळवतात. मात्र ज्यांना हे जमत नाही त्यांच्यावर अभिनय कारकिर्द सोडण्याची वेळ येते. अभिनयाचे क्षेत्र सोडाव्या लागलेल्या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री आमिषा पटेल.

अभिनेत्री अमिषा पटेलने 'कहो ना प्यार है' या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. हृतिक रोशननेही या सिनेमाव्दारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हा सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर अमिषा आणि हृतिक रातोरात स्टार झाले होते.या सिनेमानंतर 'गदर एक प्रेमकथा' सनी देओलसह आमिषा पटेलचा हा सिनेमाही सुपरहिट ठरला.आमिषाकडे पैसा प्रसिद्धी सगळे काही होते. मात्र मिळालेले यश आमिषा पटेल टिकवता आले नाही. करिअरच्या शिखरावर असताना अचानक आमिषाचा एक वाद समोर आला. आई-वडिलांवरच गंभीर आरोप आमिषाने केले.

 

मीडिया रिपोर्टनुसार, एका दिवशी अमीषाने तिच्या मुलाखतीत सांगितले, 'तिचे वडील तिच्या कमाईचा दुरुपयोग करीत आहेत.' या बातमीचा थेट परिणाम अमिषा पटेल यांच्या कारकीर्दीवर होऊ लागला. त्याचवेळी अमीषा पटेलचे एका प्रसिद्ध दिग्दर्शकासह अफेअर सुरु झाले होते. आमिषाचे प्रेमात पडणे तिच्या पालकांना अजिबात मान्य नव्हते. अमीषाच्या आई-वडिलांनी तिला घरातून हाकलून दिले होते. 

आमिषा इथेच शांत बसली नाही तिने थेट  प्रेस कॉन्फ्रेंस बोलावली आणि त्यात तिच्या आईवरच तिने खूप गंभीर आरोप केले. आईने चपलांनी मारत तिला घराबाहेर काढल्याचे तिने मीडियाला सांगितले. सगळंकाही बोलून आमिषा पटेलची निगेटीव्ह पब्लिसिटीच जास्त झाली. या वादानंतर आमिषा पटेलची इमेज पूर्णपणे बदलली होती.

आमिषाला हा वाद इतका भोवला की, तिचे करिअर पूर्णपणे संपले. तिने कमावलेला पैसाही संपला कुटंबाचीही साथ मिळाली नाही आणि ज्याच्या प्रेमात ती होती त्यानेही ऐनवेळी पाठ फिरवली. 2006 मध्ये अब्बास मस्तानच्या ‘हमराज’ने तिच्या करिअरला काहीसा आधार दिला. पण तोपर्यंत अमिषाचे स्टारडम संपले होते. 2018 साली ‘भैयाजी सुपरहिट’ हा तिचा सिनेमा रिलीज झाला. पण हा सिनेमाही दणकून आपटला.
 

Web Title: When Ameesha Patel Had Sent A Legal Notice To Her Father For Mismanaging Her Accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.