शाहिद कपूर आणि सैफ अली खानसोबत एकाच लिफ्टमध्ये अडकलीस तर काय करशील? यावर करिना कपूरने दिले हे भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 02:55 PM2020-06-05T14:55:29+5:302020-06-05T14:56:38+5:30

करण जोहरने करिनाला विचारले होते की, तू तुझा पूर्वप्रियकर शाहिद कपूर आणि पती सैफ अली खानसोबत एकाच लिफ्टमध्ये अडकली तर काय करशील? त्यावर क्षणाचाही विलंब न करता करिनाने उत्तर दिले होते.

When Kareena Kapoor Reacted On Being Stuck In A Lift With Ex, Shahid Kapoor And Husband Saif Ali Khan | शाहिद कपूर आणि सैफ अली खानसोबत एकाच लिफ्टमध्ये अडकलीस तर काय करशील? यावर करिना कपूरने दिले हे भन्नाट उत्तर

शाहिद कपूर आणि सैफ अली खानसोबत एकाच लिफ्टमध्ये अडकलीस तर काय करशील? यावर करिना कपूरने दिले हे भन्नाट उत्तर

googlenewsNext
ठळक मुद्देकरिनाने उत्तर दिले होते की, ही खूपच चांगली गोष्ट असेल... कारण शाहिद आणि सैफ दोघे रंगून या चित्रपटात लवकरच एकत्र झळकणार आहे. त्यामुळे ते दोघे एकमेकांशी खूपच चांगल्या पद्धतीने गप्पा मारू शकतात

करिना आणि शाहिदची लव्ह स्टोरी एकेकाळी चांगलीच गाजली होती. पण त्यांच्यात काहीच वर्षांत दुरावा निर्माण झाला आणि करिनाने अभिनेता सैफ अली खानसोबत तर शाहिदने मीरा रजपूतसोबत लग्न केले. 

शाहिद आणि करिना यांची पहिली भेट ‘फिदा’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. २००४ ते २००७ अशी तीन वर्षं करिना आणि शाहिद एकमेकांना डेट करत होते. त्यांची लव्हस्टोरी अशी काही बहरली होती की, बॉलिवूडमध्ये हे लव्हबर्ड्स सदैव चर्चेत असायचे. पुढे ते विभक्त झाले. ‘उडता पंजाब’ या चित्रपटात शाहिद आणि करिना एकत्र बघावयास मिळाले होते. मात्र यासाठी दोघांनी एकत्र शूटिंग करणे टाळले होते. एवढेच नव्हे तर प्रमोशनला देखील ते एकमेकांशी बोलत नसल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर करिनाचा पती सैफ अली खानसोबत शाहिद ‘रंगून’मध्ये दिसला होता.

सैफ आणि करिना हे बी टाऊनमधील हॉट कपल मानले जाते. २०१६ मध्ये करिना कपूर गरोदर असताना तिने कॉफी विथ करण या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक करण जोहरने करिनाने विचारलेल्या एका प्रश्नाची चांगलीच चर्चा झाली होती. करणने करिनाला विचारले होते की, तू तुझा पूर्वप्रियकर शाहिद कपूर आणि पती सैफ अली खानसोबत एकाच लिफ्टमध्ये अडकली तर काय करशील? त्यावर क्षणाचाही विलंब न करता करिनाने उत्तर दिले होते की, ही खूपच चांगली गोष्ट असेल... कारण शाहिद आणि सैफ दोघे रंगून या चित्रपटात लवकरच एकत्र झळकणार आहे. त्यामुळे ते दोघे एकमेकांशी खूपच चांगल्या पद्धतीने गप्पा मारू शकतात आणि मी रंगूनची नायिका का नाहीये अशी मी त्यांच्यासोबत चर्चा करेन...

Web Title: When Kareena Kapoor Reacted On Being Stuck In A Lift With Ex, Shahid Kapoor And Husband Saif Ali Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.