ड्रायव्हरसमोर जायलाही लाज वाटायची...! ‘न्यूड क्लिप’ लीक झाल्यावर अशी झाली होती राधिका आपटेची अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 11:52 AM2021-05-21T11:52:57+5:302021-05-21T11:54:52+5:30
Clean Shaven चित्रपटाच्या वेळी राधिकाची न्यूड क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणामुळे राधिकाला जबरदस्त मानसिक धक्का बसला होता.
राधिका आपटे (Radhika Apte) म्हणजे बॉलिवूडची बोल्ड अन् बिनधास्त अभिनेत्री. हिंदी, मराठी शिवाय साऊथच्या अनेक सिनेमांत दमदार भूमिका साकारणा-या राधिकाने फार कमी वेळात इंडस्ट्रीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. पण सोबत अनेक कॉन्ट्रोव्हर्सीमुळेही ती चर्चेत राहिली. न्यूड सीन्स लीक झाल्यामुळे तिच्यावर प्रचंड टीका झाली होती. आजपर्यंत राधिका यावर बोलली नव्हती. पण आता पहिल्यांदा तिने ‘न्यूड व्हिडीओ लीक’वर प्रतिक्रिया दिली आहे. (Radhika Apte Leaked Nude Video)
ग्रेझिया या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत ती यावर बोलली. न्यूड सीन्सचा व्हिडीओ लीक झाल्यानंतरचा अनुभव तिने यावेळी सांगितला. राधिकाने 2015 मध्ये ‘पार्च्ड’ नावाचा एक चित्रपट केला होता. या चित्रपटात तिने काही न्यूड सीन्स दिले होते. या सीन्सच्या क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. अगदी काही पॉर्न वेबसाईट्सवर देखील या क्लिप्स चर्चेत होत्या. ‘Clean Shaven’च्या शूटींगदरम्यानची तिची एक न्यूड क्लिपही लीक झाली होती. या प्रकरणामुळे राधिकाला जबरदस्त मानसिक धक्का बसला होता.
घरातून निघणे मुश्किल झाले होते...
‘Clean Shaven’ची माझी एक न्यूड क्लिप लीक झाल्यानंतर मला प्रचंड ट्रोल करण्यात आले. याचा मला जबर धक्का बसला होता. मी चार दिवस घरातून बाहेर पडले नव्हते़. मी खूप घाबरले होते. माझा ड्रायव्हर, घरातील मोलकरीण, दुकानात जायला देखील मला भीती वाटत होती. ते माझ्याबद्दल काय विचार करत असतील, हा विचार मनात येत होता. अगदी फोनची रिंग वाजली तरी मी घाबरायचे. कोण काय विचार करेल? कोण माझ्याकडे कुठल्या दृष्टीने पाहत असेल या विचारामुळे मी जणू नैराश्येत गेले होते. जवळपास एक आठवडा मी स्वत;ला घरात बंद करुन घेतले होते. पण अशा परिस्थितीत मला माझ्या कुटुंबीयांनी सावरले. मी एक अभिनेत्री आहे. समाजातील व्यक्तिरेखा साकारणे हेच माझे काम आहे, हे आईने मला समजावून सांगितले. त्यामुळे मी त्यातून बाहेर पडू शकले, असे ती म्हणाली.
‘पार्च्ड’साठी न्यूड सीन देणे सोपे नव्हते...
‘पार्च्ड’साठी न्यूड सीन्स देणे त्यावेळी माझ्यासाठी सोपे नव्हते. कारण त्यावेळी मी माझ्या बॉडी इमेजशी लढत होते. त्यामुळे स्क्रीनवर न्यूड सीन्स देणे कठीण होते. पण आता मला माझ्या शरीरावर, माझ्या साईज व शेपचा अभिमान आहे. आता मी हे सर्व कुठेही करू शकते. बॉलिवूडमध्ये तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल अनेक सल्ले दिले जातात. पण मी माझ्या शरीरासोबत वा चेह-यासोबत काहीही करणार नाही, हे मी नेहमीच स्पष्ट सांगितले आहे, असे ती म्हणाली.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती ‘मिसेस अंडरकव्हर’ या सिनेमात दिसणार आहे.