रवीना टंडन  व शिल्पा शेट्टीची ‘कॉमन मिस्टेक’; नॅशनल टीव्हीवर केला होता खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 11:38 AM2021-06-24T11:38:56+5:302021-06-24T11:39:27+5:30

होय, रवीना टंडन  व शिल्पा शेट्टी दोघींनीही अगदी नॅशनल टीव्हीवर या ‘कॉमन मिस्टेक’ची कबुली दिली होती.  

When Raveena Tandon and Shilpa Shetty remembered their ‘common mistake’, Akshay Kumar’s connection! | रवीना टंडन  व शिल्पा शेट्टीची ‘कॉमन मिस्टेक’; नॅशनल टीव्हीवर केला होता खुलासा

रवीना टंडन  व शिल्पा शेट्टीची ‘कॉमन मिस्टेक’; नॅशनल टीव्हीवर केला होता खुलासा

googlenewsNext
ठळक मुद्देशिल्पा शेट्टीसोबतच्या नात्यावर अक्षय कुमार कधीच काही बोलला नाही. पण शिल्पाने मात्र एका मुलाखतीत आपल्या मनातील भडास काढली होती.

बॉलिवूडची ‘मस्त मस्त गर्ल’ रवीना टंडनने  (Raveena Tandon) ‘पत्थर के फूल’ या सिनेमातून डेब्यू केला होता. यानंतर मोहरा आणि दिलवाले सुपरडुपर हिट ठरला आणि रवीना टॉपची हिरोईन बनली. मोहरा या सिनेमात रवीना व अक्षय कुमारच्या जोडीने नुसती ‘आग’ लावली होती. दुसरीकडे ‘बाजीगर’मधून डेब्यू करणा-या शिल्पा शेट्टीनेही  (Shilpa Shetty) ‘मैं खिलाडी तू अनाडी’ या सिनेमात अक्षयसोबत काम केले होते. या दोन्ही जोड्यांची पडद्यावरची केमिस्ट्री जबरदस्त होती. पडद्यामागेही ही केमिस्ट्री फुलत चालली होती. होय, रवीना व शिल्पा दोघीही अक्षय कुमारवर (Akshay Kaumar) भाळल्या होत्या. पण पुढे दोघींनाही आपण एक ‘कॉमन मिस्टेक’ केल्याचा साक्षात्कार झाला होता.

होय,  सुपर डान्सर चॅप्टर 2 मध्ये दोघींनीही अगदी नॅशनल टीव्हीवर या ‘कॉमन मिस्टेक’ची कबुली दिली होती.   शिल्पा आणि रवीना दोघीही या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये हजर होत्या. शिल्पा शेट्टी शोची जज होती. तर रवीना गोविंदासोबत स्पेशल गेस्ट म्हणून पोहोचली होती. यावेळी मी माझ्या आयुष्यात अनेक चुका केल्या, असे रवीना म्हणाली होती. यावर शिल्पाला हसू आवरले नव्हते.  यापैकी काही चुका कॉमन होत्या, असे म्हणत शिल्पा खळखळून हसली होती. शिल्पाने कुणाचेही नाव घेतले नव्हते. पण तिचा इशारा अक्षय कुमारकडे होता.


 
एकेकाळी अक्षय कुमार  आणि शिल्पा शेट्टीच्या अफेअरची बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा रंगली होती. याचवेळी अक्षय व रवीनाच्या अफेअरच्याही चर्चा होत्या. शिल्पा व रवीना दोघीही अक्षयच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या. पण दोघींच्याही वाट्याला विश्वासघात आला.
90च्या दशकात अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीची प्रेमकथा कुणापासून लपून राहिलेली नव्हती.   प्रत्येक मासिकापासून ते चहाच्या दुकानांपर्यंत त्यांच्या प्रेमाविषयी चर्चा होती. 1994 साली ‘मैं खिलाड़ी तू अनाड़ी’ सिनेमाच्या शूटींगवेळी अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांची भेट झाली होती. इथूनच दोघांच्या नात्याला सुरूवात झाली होती. 2000मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. शिल्पासोबत ब्रेकअप झाल्यानंतर 2001मध्ये अक्षयने ट्विंकलसोबत लग्न केले.
 अक्षय कुमार त्याआधी रवीना टंडनला डेट करत होता. रवीना आणि शिल्पा खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. 1994 साली जेव्हा शिल्पा आणि अक्षय सिनेमात एकत्र काम करते होते तेव्हा अक्षय रवीना डेट करत होता. 


 
शिल्पा शेट्टीसोबतच्या नात्यावर अक्षय कुमार कधीच काही बोलला नाही. पण शिल्पाने मात्र एका मुलाखतीत आपल्या मनातील भडास काढली होती. अक्षय तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असतानाच तो ट्विंकल खन्नालाही डेट करत होता. ब्रेकअपनंतर  2000 मध्ये शिल्पा शेट्टीने मुलाखत दिली होती.  अक्षय कुमारने माझा विश्वासघात केला. त्याने ‘टू टायमिंग’ केले, असे ती म्हणाली होती. अक्षयने माझा वापर केला. दुसरी मिळाल्यावर मला सोडून दिले. त्याने मला फसवले. दगा दिला. मला खात्री आहे की काळ  याचा हिशोब ठेवेल. अक्षयने जे काही केले ते एक दिवस त्याच्यासोबतही तसेच घडेल, असेही ती म्हणाली होती.
 

Web Title: When Raveena Tandon and Shilpa Shetty remembered their ‘common mistake’, Akshay Kumar’s connection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.