अब्बा आप...; सैफ अली खान 50 व्या वर्षी चौथ्यांदा बाप झाला अन् लेकीने टोमणा मारला..!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 11:22 AM2022-03-08T11:22:34+5:302022-03-08T11:24:12+5:30
Sara Ali Khan : जेहचा जन्म झाला त्यावेळीही सारा अली खान त्याला पाहायला गेली होती. माझा छोटा भाऊ खूपच क्यूट आहे, असं ती म्हणाली होती. पण याचवेळी तिने तिच्या अब्बूला टोमणा मारला होता.
सैफ अली खान (Saif Ali Khan ) आणि त्याची ‘लाडली’ सारा अली खान (Sara Ali Khan) ही बॉलिवूडची बेस्ट फादर अॅण्ड डॉटर जोडी म्हणून ओळखली जाते. सैफ आणि अमृता सिंगचा घटस्फोट झाला, त्यावेळी सारा खूप लहान होती. घटस्फोटानंतर सारा आईसोबत राहायला लागली. पण म्हणून अब्बूवरचं तिचं प्रेम कमी झालं नाही. वेळ मिळाला की ती तिच्या अब्बूला भेटायला पोहोचते. त्यांच्यासोबत वेळ घालवते. तिच्या अब्बूनी करिना कपूरसोबत (Kareena Kapoor) दुसरं लग्न केलं. पाठोपाठ तैमूर आणि जहांगीर या तिच्या सावत्र भावांचा जन्म झाला. पण साराने हे मनापासून स्वीकारलं. नुकताच सैफ व करिनाचा दुसरा मुलगा जेह एका वर्षाचा झाला. त्याच्या वाढदिवसाला सारा खूप सारी खेळणी घेऊन पोहोचली होती. जेहचा जन्म झाला त्यावेळीही ती त्याला पाहायला गेली होती. माझा छोटा भाऊ खूपच क्यूट आहे, असं ती म्हणाली होती. पण याचवेळी गमती गमतीत तिने तिच्या अब्बूला टोमणा सुद्धा मारला होता.
सैफ व करिनाचा दुसरा मुलगा जेह याच्या जन्मानंतर एका मुलाखतीत सारा बोलली होती. ‘माझा छोटा भाऊ (जेह) खूपच क्यूट आहे. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि हसू लागला. त्याला तसं हसताना बघून त्याचे किती लाड करू असं मला झालं होतं. तो एकदम क्यूट बॉलसारखा आहे. मी माझ्या अब्बाची नेहमी मस्करी करते. तुम्ही खूप लकी आहात. आयुष्यात प्रत्येक दशकात तुम्हाला एक मुलं झालं. 20 व्या, 30 व्या,40 व्या आणि 50 व्या वर्षी तुम्ही बाप झालात. त्यांचं हे बाळ माझ्या वडिलांच्या आणि करिनाच्या आयुष्यात नवा आनंद घेऊन आला आहे. याचा मलाही आनंद आहे,’ असं सारा म्हणाली होती.
बरं झालं माझ्या आई-बाबाचा घटस्फोट झाला...
एका जुन्या मुलाखतीत साराने तिच्या मॉम-डॅडच्या नात्याबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. सैफ आणि अमृता सिंग यांच्या घटस्फोटावर ती बोलली होती.
तुझ्या आईवडिलांच्या घटस्फोटाचं दु:ख आहे का? असा प्रश्न तिला केला गेला होता. यावर बरं झालं त्यांचा घटस्फोट झाला, असं सारा म्हणाली होती. त्यांचा घटस्फोट झाला, यासाठी मी देवाचे आभार मानते. दोन लोक एकमेकांसोबत आनंदी राहू शकत नसतील तर त्यांनी विभक्त व्हावं. त्यात काहीही गैर नाही. एकमेकांसोबत आनंदी नसूनही केवळ मुलांसाठी आयुष्यभर तडतोड करणे, याला काहीही अर्थ नाही, असं मी मानते. लोक अनेकदा एकमेकांसोबत आनंदी नसतात. पण मुलांसाठी ते एकत्र राहतात. हा विचारच मला करवत नाही, असं ती म्हणाली होती. माझं माझ्या अब्बावर खूप प्रेम आहे. पण माझ्या आईचा माझ्यावर जास्त प्रभाव आहे. कारण मी आज जे काही आहे, ते तिच्यामुळे. तिने एकटीनं आम्हाला वाढवलं. माझी आई माझी ताकद आहे. ती माझी आई आहे, मैत्रिण आहे. ती माझं आयुष्य आहे, असंही सारा म्हणाली होती.