काय सांगता? अरमान कोहलीमुळं शाहरूख खान रातोरात झाला सुपरस्टार...!!  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 05:08 PM2021-08-29T17:08:51+5:302021-08-29T17:11:03+5:30

आज सकाळी बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला पोलिसांनी ड्रग्स प्रकरणात अटक केली. कधीकाळी याच अरमान कोहलीचे शाहरूख खानने जाहिर आभार मानले होते.

When Shah Rukh Khan credited Armaan Kohli for his stardom | काय सांगता? अरमान कोहलीमुळं शाहरूख खान रातोरात झाला सुपरस्टार...!!  

काय सांगता? अरमान कोहलीमुळं शाहरूख खान रातोरात झाला सुपरस्टार...!!  

googlenewsNext
ठळक मुद्देअरमान कोहलीने 1992 साली ‘विरोधी’ या सिनेमातून डेब्यू केला होता.  अरमान  हा ज्येष्ठ दिग्दर्शक राजकुमार कोहली आणि ज्येष्ठ अभिनेत्री निशी यांचा मुलगा आहे.

बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला (Armaan Kohli) मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी संध्याकाळी एनसीबीने अरमान कोहलीच्या मुंबईतील घरावर छापा टाकला होता.  त्यावेळी अरमानच्या घरात अमेरिकन कोकेन सापडलं. त्यानंतर अरमानची चौकशी करण्यात आली होती आणि आज सकाळी मुंबई पोलिसांनी अरमानला या प्रकरणी अटक केली. कधीकाळी याच अरमान कोहलीचे शाहरूख खानने (ShahRukh Khan) जाहिर आभार मानले होते. अरमान कोहलीमुळे मी सुपरस्टार बनलो, असं शाहरूख म्हणाला होता. आता शाहरूखला सुपरस्टार बनवण्यात अरमान कोहलीचं काय योगदान? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आहे.

2016 साली ‘यारों की बारात’ शोमध्ये खुद्द शाहरूखने याचा खुलासा केला होता. माझ्या यशात अरमान कोहलीचा मोठा वाटा आहे. माझ्या यशाचे श्रेय मी त्यालाही देतो,असे शाहरूख म्हणाला होता. याचे कारण म्हणजे, ‘दीवाना’ हा सिनेमा.

होय, ‘दीवाना’ या सिनेमासाठी शाहरूख खानआधी अरमान कोहलीला साईन करण्यात आले होते. अगदी चित्रपटाचे एक शेड्यूलही त्यानं शूट केलं होतं. चित्रपटाचं पोस्टरही छापून तयार होतं. या पोस्टरवर अरमान दिव्या भारतीसोबत झळकला होता.आजही हे पोस्टर शाहरूखने जपून ठेवलं आहे. पण मग काही कारणास्तव अगदी ऐनवेळी अरमानने हा सिनेमा करण्यास नकार दिला आणि यानंतर हा सिनेमा शाहरूखला मिळाला. ‘दीवाना’ सुपरहिट झाला आणि शाहरूख एका रात्रीत स्टार झाला.

अरमान कोहलीने 1992 साली ‘विरोधी’ या सिनेमातून डेब्यू केला होता.  अरमान  हा ज्येष्ठ दिग्दर्शक राजकुमार कोहली आणि ज्येष्ठ अभिनेत्री निशी यांचा मुलगा आहे.  बदले की आग  आणि  राज तिलक  या सिनेमातून बालकलाकार म्हणून अरमानने सिनेसृष्टीत प्रवेश केला होता. हे दोन्ही सिनेमे त्याच्या वडिलांनी म्हणजे राजकुमार कोहली यांनी दिग्दर्शित केले होते.
विरोधी, दुश्मन जमाना, औलाद के दुश्मन, वीर, कहर, जानी दुश्मन यांसारख्या सिनेमात अरमानने काम केलेले आहे.  सलमानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ सिनेमातही तो दिसला होता. 2013 सालच्या बिग बॉसच्या सीझनमध्येही अरमान सहभागी झाला होता. 

Read in English

Web Title: When Shah Rukh Khan credited Armaan Kohli for his stardom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.