"तुला बंदुकीचं लायसन्स काढून देऊ का?", बाळासाहेब ठाकरेंनी वंदना गुप्तेंना असं का विचारलं? अभिनेत्रीने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 02:48 PM2024-09-27T14:48:24+5:302024-09-27T14:48:54+5:30

वंदना गुप्ते आणि ठाकरे कुटुंबाचे जवळचे संबंध आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वंदना गुप्ते यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक किस्सा सांगितला आहे.

when shivsena balasaheb thackeray asked actress vandana gupte did she want gun license | "तुला बंदुकीचं लायसन्स काढून देऊ का?", बाळासाहेब ठाकरेंनी वंदना गुप्तेंना असं का विचारलं? अभिनेत्रीने सांगितला किस्सा

"तुला बंदुकीचं लायसन्स काढून देऊ का?", बाळासाहेब ठाकरेंनी वंदना गुप्तेंना असं का विचारलं? अभिनेत्रीने सांगितला किस्सा

वंदना गुप्ते या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. अनेक सुपरहिट सिनेमे आणि नाटकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या वंदना त्यांच्या दिलखुलास आणि बिनधास्त व्यक्तिमत्त्वासाठी ओळखल्या जातात. वंदना गुप्ते आणि ठाकरे कुटुंबाचे जवळचे संबंध आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वंदना गुप्ते यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक किस्सा सांगितला आहे. 

'बाईपण भारी देवा' या सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या वंदना गुप्ते यांनी नुकती आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, "तेव्हा घरी यायला दीड-दोन वगैरे वाजायचे. पण, तेव्हा काही वाटायचं नाही. भीती वाटायची नाही किंवा काळजी नसायची. बाळासाहेब ठाकरे मला भूत म्हणायचे. मला आठवतंय त्यांनी एकदा मला विचारलं होतं की तू एवढ्या उशिरा येतेस जातेस तर तुला मी बंदुकीचं लायसन्स काढून देऊ का? तर तेव्हा त्यांना शिरीष( वंदना गुप्ते यांचे पती) म्हणाला की नको माझाच पहिला खून होईल. तेव्हा त्यांनाही अशी काळजी वाटायची".


वंदना गुप्ते यांनी काही मालिकांमध्येही काम केलं आहे. मराठीबरोबरच त्यांनी हिंदी टेलिव्हिजनचा पडदा देखील गाजवला. 'फॅमिली कट्टा', 'टाइम प्लीज', 'बे दुणे साडे चार', 'डबल सीट', 'मर्डर मेस्त्री', 'मातीच्या चुली', 'कारखानिसांची वारी' अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. 'पछाडलेला' या सिनेमातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. 

Web Title: when shivsena balasaheb thackeray asked actress vandana gupte did she want gun license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.