'शक्य असेल तर ते माझं लग्नही होऊ द्यायचे नाहीत'; वडिलांविषयी सोनाक्षीचं मोठ विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 01:02 PM2024-06-17T13:02:34+5:302024-06-17T13:02:59+5:30

Sonakshi sinha: सोनाक्षीने दिलेली मुलाखत सध्या चर्चेत आली आहे.

when-sonakshi-sinha-revealed-her-father-shatrughan-sinha-did-not-want-her-to-get-married-t | 'शक्य असेल तर ते माझं लग्नही होऊ द्यायचे नाहीत'; वडिलांविषयी सोनाक्षीचं मोठ विधान

'शक्य असेल तर ते माझं लग्नही होऊ द्यायचे नाहीत'; वडिलांविषयी सोनाक्षीचं मोठ विधान

हिरामंडीची फरीदन म्हणजे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. येत्या २३ जून रोजी सोनाक्षी जहीर इक्बालसोबत लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिचीच फक्त चर्चा आहे. या मध्येच सोनाक्षीची एक जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या लग्नाविषयी वडील शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांचं मत काय आहे हे सांगितलं. 'जर शक्य झालं तर ते माझं लग्नही होऊ देणार नाहीत,' असं विधान तिने या मुलाखतीमध्ये केलं होतं.

२०२१ मध्ये सोनाक्षीने 'बॉलिवूड बबल'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये सोनाक्षीने तिच्या कुटुंबाचं तिच्या लग्नाविषयी काय मत आहे हे सांगितलं.

ते माझं लग्न होऊ द्यायचे नाहीत

"जर त्यांना शक्य असेल तर ते कधीच माझं लग्न होऊ द्यायचे नाहीत. माझी आई कधी कधी मुद्दाम त्यांच्याजवळ माझ्या लग्नाचा विषय काढते. की, आता तिचं लग्नाचं वय झालंय वगैरे. मग मी त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकते आणि मग ते (शत्रुघ्न सिन्हा.) फक्त अच्छा. ठीक आहे, ठीक आहे, इतकंच बोलतात", असं सोनाक्षी म्हणाली.

पुढे ती म्हणते, माझ्या आई-वडिलांनी मला जे स्वातंत्र्य दिलंय त्यासाठी मी खरंच खूप खूश आहे. जोपर्यंत मी लग्नासाठा तयार नव्हते तोपर्यंत त्यांनी कधीच माझ्यावर लग्न करण्याचा दबाव टाकला नाही. दरम्यान, सोनाक्षी आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या चर्चांवर अलिकडेच शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी, सोनाक्षीच्या निर्णयाला कायम पाठिंबा देईन, असं ते म्हणाले होते.

Web Title: when-sonakshi-sinha-revealed-her-father-shatrughan-sinha-did-not-want-her-to-get-married-t

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.