राणी मुखर्जीच्या नवऱ्याची पहिली बायको! शाळेतील प्रेम, दिसायला खूपच सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 12:16 PM2023-02-20T12:16:06+5:302023-02-20T12:22:11+5:30
आदित्य चोप्रा आणि पायल खन्ना यांच्या घटस्फोटामागे राणी मुखर्जी कारणीभूत ठरवलं गेले, परंतु अभिनेत्रीने हे सर्व आरोप फेटाळून लावले.
आदित्य चोप्रा यांना लाईमलाइटमध्ये राहणे अजिबात आवडत नाही.दिवंगत यश चोप्रा यांचा आदित्य चोप्रा मोठा मुलगा आहे. वयाच्या १८ व्या वर्षीच त्यांनी वडिलांसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरवात केली होती. तर त्यांनी वयाच्या 23 व्या वर्षी अजरामर ठरलेल्या 'दिलवाल्या दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमाचे दिग्दर्शन केले.अनेक ब्लॉकबस्टर सिनेमा देऊनही, आदित्य कधीच मीडियाच्या कॅमेरा समोर येत नाही.
राणी मुखर्जी(Rani Mukerji) शी लग्न करण्यापूर्वी आदित्य चोप्राच्या आयुष्यात पायल खन्ना होती, जिच्यासोबत त्यांचे लग्न सुमारे 8 वर्षे टिकले. लोकांना असे वाटले की आदित्य चोप्रा आणि पायल खन्ना यांच्या घटस्फोटामागे राणी मुखर्जी कारणीभूत आहे, परंतु अभिनेत्रीने हे सर्व आरोप फेटाळून लावले.
राणी मुखर्जीने इंडिया फोरमला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, 'त्याचा घटस्फोट झाला तेव्हापासून मी त्याला डेट करायला सुरुवात केली होती. 'पापाराझींनी राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांना क्वचितच एकत्र पाहिले होते. या जोडप्याने 2014 मध्ये लग्न केले आणि आज त्यांना अदिरा नावाची एक सुंदर मुलगी आहे जी सुमारे 7 वर्षांची आहे.
पायल खन्ना आदित्यला शालेय दिवसांपासून ओळखते. दोघांनी 2001 मध्ये लग्न केले होते. आदित्यचे आई-वडील यश चोप्रा आणि पामेला चोप्रा हे पायलच्या जवळ असल्याने राणी मुखर्जीला पटकन स्वीकारू शकत नसल्याची चर्चा होती. आदित्य आणि पायल यांचा २००९ मध्ये घटस्फोट झाला. तीही दिसायला राणीसारखीच सुंदर आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 51 वर्षीय आदित्य चोप्राची माजी पत्नी पायल खन्ना फिल्म प्रोड्यूसर असण्यासोबतच एक इंटिरियर डिझायनर आहे. पायल आदित्यला बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये भेटली, जिथे दोघेही विद्यार्थी होते.आदित्यशी लग्न केल्यानंतर पायलने यशराज स्टुडिओसाठी डिझायनिंग सुरू केले. पायलचे मुंबई आणि बंगळुरूमध्ये अनेक रेस्टॉरंट आहेत.