Oscar: 'या' आहेत ऑस्कर पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय महिला; तुम्हाला माहितीये कोण आहेत त्या?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 01:20 PM2024-03-09T13:20:29+5:302024-03-09T13:21:44+5:30
ऑस्कर 2024 सोमवारी भारतात पाहायला मिळणार आहे. त्यानिमित्ताने हा किस्सा वाचा
ऑस्कर 2024 ला काहीच तासांमध्ये सुरुवात होईल. ११ मार्च पहाटे ५ वाजता ऑस्कर 2024 पाहायला मिळेल. यंदाच्या ऑस्करमध्ये 'ओपनहायमर', 'बार्बी' सारखे अनेक सिनेमे शर्यतीत आहेत. भारतासाठी यंदाचा ऑस्कर खास आहे तो यासाठी... 'टू किल अ टायगर' या डॉक्यूमेंट्रीला यंदाच्या ऑस्करमध्ये नॉमिनेशन आहे. गेल्या वर्षी RRR सिनेमाची ऑस्करमध्ये चांगलीच हवा होती. पण तुम्हाला माहित आहे का? भारताला पहिला ऑस्कर कोणी आणून दिला?
भारतातील पहिला ऑस्कर पुरस्कार भानू अथैया यांना देण्यात आला. 1983 मध्ये 55 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनसाठी त्यांनी पहिला ऑस्कर जिंकला. १९८३ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेता आणि दिग्दर्शकासह आठ ऑस्कर पुरस्कार "गांधी" सिनेमाला गेले. ब्रिटिश डिझायनर जॉन मोलोसोबत कॉस्च्युम डिझाइन ट्रॉफी शेअर करताना अथैया इतिहासातील पहिली भारतीय वंशाची ऑस्कर विजेती ठरली.
1983 :: Bhanu Athaiya Became First Indian to Win Oscar For Best Costume Design For Movie 'Gandhi' #Oscarpic.twitter.com/WBjOVd8P9X
— indianhistorypics (@IndiaHistorypic) March 12, 2023
ऑस्कर 2024 हॉटस्टारवर ११ मार्चला पहाटे ४ वाजल्यापासून पाहता येईल. यंदाच्या ऑस्करमध्ये 'बार्बी', 'ओपनहायमर', 'किलर ऑफ द फ्लॉवर मून', 'पास्ट लाईव्ह्स', 'मॅसट्रो', 'अॅनॉटमी ऑफ अ फॉल', 'द होल्डओव्हर्स', 'पुअर थिंग', 'झोन ऑफ इंटरेस्ट', 'अमेरिकन फिक्शन' हे सिनेमे बेस्ट फिल्मस् साठी ऑस्करच्या शर्यतीत आहेत.