प्रिया बापट आणि उमेश कामतसोबत फोटोत दिसणारी ही चिमकुली आहे तरी कोण ?, नेटकऱ्यांना पडला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 01:40 PM2022-07-18T13:40:14+5:302022-07-18T13:41:48+5:30

फोटोत प्रिया आणि उमेशसोबत असलेल्या लहान मुलीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ती प्रिया आणि उमेशची मुलगी आहे का असा प्रश्न नेटकरी विचारतायेत.

Who is this cute girl in the picture with Priya Umesh Kamat?, Know about their relationship | प्रिया बापट आणि उमेश कामतसोबत फोटोत दिसणारी ही चिमकुली आहे तरी कोण ?, नेटकऱ्यांना पडला प्रश्न

प्रिया बापट आणि उमेश कामतसोबत फोटोत दिसणारी ही चिमकुली आहे तरी कोण ?, नेटकऱ्यांना पडला प्रश्न

googlenewsNext

उत्तम अभिनय आणि तितकाच खेळकर स्वभाव यामुळे प्रिया बापटने रसिकांच्या मनात वेगळेत स्थान निर्माण केले आहे. करिअरची सुरुवात केल्यापासून प्रियाने आतापर्यंत तिच्या यशाचा आलेख कायम उंच ठेवला आहे. त्यामुळे तिला आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजले जाते.

सोशल मीडियावर प्रिया बापट बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. प्रियाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रिया आणि उमेशसोबत असलेल्या लहान मुलीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.आणि उमेशसोबत असलेल्या या लहान मुलीचं नाव शरीवा आहे. याचा खुलासा प्रियाने कॅप्शनमधून केला आहे. पण ही चिमुकली कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. याच उत्तर आम्ही तुम्हाला सांगतो. शरीवा ही प्रियाच्या बहिणीची मुलगी आहे. प्रिया तिची मावशी आहे. 

शरीवाच्या पाचव्या वाढदिवसाचे फोटो प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.  शरीवाला प्रियाच्या चाहत्यांनी ही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोवर सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. 

साधारण पाच वर्षांची असता पासून प्रियाने अभिनयाला सुरूवात केली आहे. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक नावाच्या शाळेच्या नाटकात तिने म्हातारीची भूमिका केली होती. या भुमिकेसाठी तिला पहिलं बक्षिसही मिळालं होतं. तेव्हा अभिनेत्री म्हणून करिअर वगैरे करण्याचा विचार तिच्या मनात देखील नव्हता. अभिनय म्हणजे काय हे फार कळतंही नसताना फक्त आपल्या कामाचं कौतुक होतंय, सर्वांना आवडतंय यातच आनंद मानून तिने आपला अभिनयाचा प्रवास सुरू ठेवला. 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. 

Web Title: Who is this cute girl in the picture with Priya Umesh Kamat?, Know about their relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.