Worst indian actor कोण? गुगल म्हणतो, सलमान खान!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 06:46 AM2018-06-19T06:46:36+5:302018-06-19T06:46:44+5:30

सलमान खानच्या ‘रेस3’ या नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटाला समीक्षकांनी फार दाद दिली नाही. पण सलमानच्या चाहत्यांना यामुळे जराही फरक पडला नाही.

Who is the Worst Indian actor? Google says, Salman Khan !! | Worst indian actor कोण? गुगल म्हणतो, सलमान खान!!

Worst indian actor कोण? गुगल म्हणतो, सलमान खान!!

googlenewsNext

सलमान खानच्या ‘रेस3’ या नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटाला समीक्षकांनी फार दाद दिली नाही. पण सलमानच्या चाहत्यांना यामुळे जराही फरक पडला नाही. समिक्षक काहीही म्हणोत, भाईचा चित्रपट म्हटल्यावर त्यावर चाहत्यांच्या उड्या पडल्यात आणि याचा परिणाम म्हणजे, पहिल्या तीन दिवसांतच या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमवला. अद्यापही भाईजानच्या या चित्रपटाची बॉक्सआॅफिसवरची घोडदौड सुरुचं आहे,. यावरून भाईची चाहत्यांमध्ये किती क्रेज आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. चाहत्यांसाठी सलमान खान सुपरस्टार आहे. पण याच सुपरस्टारबद्दल गुगलचे काय मत आहे, हे तुम्हाला माहित आहे?. गुगलच्या मते, सलमान भारतातील सगळ्यात खराब अभिनेता आहे. होय, गुगलवर तुम्ही Worst indian actor असे टाईप केलेच तर गुगल सलमानचेच नाव घेताना दिसेल. सध्या ट्विटरवर याची जोरात चर्चा सुरु आहे. एका चिकित्सक युजरने या चर्चेला तोंड फोडले. गुगलवर सर्वांत वाईट अभिनेता कोण, हे सर्च करा आणि परिणाम बघा, असे त्याने लिहिले. यानंतर एका युजरने गुगल चूक असूच शकत नाही, म्हणत, या चर्चेत आणखी तेल ओतायचे काम केले.
आता सलमान सर्वाधिक वाईट अभिनेता का ठरला, यामागे अनेक कारणे असू शकतात. तांत्रिकदृष्ट्या बहुतांश लोकांनी सलमानचा फोटो, त्याबद्दलची माहिती वा पोस्ट शेअर करताना कीवर्ड वा टॅगमध्ये Worst indian actor असे लिहिले असावे. ‘रेस3’ चांगले रिव्ह्यू मिळाले नाहीत. कदाचित   समिक्षकांनीही सलमानसाठी Worst indian actor या कीवर्ड वा टॅगचा प्रयोग केला असावा. त्यामुळे गुगलच्या सर्च रिजल्टमध्ये सगळ्यात वाईट अभिनेता म्हटल्यावर सलमानचे नाव येत असावे.

Web Title: Who is the Worst Indian actor? Google says, Salman Khan !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.